Home /News /crime /

RT-PCR रिपोर्टवरून मुंबईला येणाऱ्या प्रवाशाचा विमानतळावरच प्रचंड गोंधळ; बॅगेज बेल्टवर उभं राहून केला तमाशा

RT-PCR रिपोर्टवरून मुंबईला येणाऱ्या प्रवाशाचा विमानतळावरच प्रचंड गोंधळ; बॅगेज बेल्टवर उभं राहून केला तमाशा

RT-PCR रिपोर्टवरून एका प्रवाशानं चक्क विमानतळ डोक्यावर घेतलं.

    नवी दिल्ली, 22 जून : कोरोनामुळे (Corona virus) सध्या देशाअंतर्गत विमान प्रवास (domestic flight service) करण्यासाठी कोरोनाची RT-PCR चाचणी (Corona RTPCR test)अनिवार्य करण्यात आली आहे. या चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट असल्याशिवाय विमान करण्यास मनाई आहे. मात्र काही लोकांना हे अजूनही कळलेलं दिसत नाही. असाच प्रकार दिल्लीच्या IGI विमानतळावर (Indira Gandhi International Airport Delhi) घडला. RT-PCR रिपोर्टवरून एका प्रवाशानं चक्क विमानतळ डोक्यावर घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार, UK 933 क्रमांकाच्या विमानानं उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) रुद्रपूरचे व्यापारी सूरज पांडे यांना मुंबईला (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Mumbai) यायचं होतं. नियमानुसार त्यांच्याकडे RT-PCR चा रिपोर्ट असणं आवश्यक होतं. मात्र त्यांच्याकडे हा रिपोर्ट नसल्यामुळे त्यांना विमानात बसण्याची परवानगी नाकारण्यात आली. यामुळे त्यांचं विमान निघून गेलं. हे पांडे यांना सहन झालं नाही. हे वाचा - डिप्रेशनमुळे बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून दिला जीव; पाहा VIDEO दुपारी तीनच्या सुमारास सूरज पांडे आरडाओरडा करायला लागले, बॅगेज बेल्टवर (Baggage Belt) चढले आणि त्यावर चालण्यास सुरवात केली. तसंच एअरलाइन्सचे कर्मचारी आणि इतर प्रवासी यांना त्रास देण्यास सुरुवात केली असा आरोप विमानतळावरील पोलिसांनी केला आहे. उत्तर प्रदेशमधील रुद्रपूर येथील व्यापारी सूरज पांडे यांना सोमवारी विस्तारा एअरलाइन्सचे उपव्यवस्थापक दीपक धंधा यांच्याकडून आलेल्या तक्रारीच्या आधारे अटक करण्यात आली. तक्रारदाराच्या आरोपांची पडताळणी करण्यासाठी आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले. आतापर्यंत झालेल्या सीसीटीव्ही फुटेज व अन्वेषणातील माहितीवरून आरोपी सूरज पांडे यांनी अनेक कलमांखाली गुन्हे केले आहेत. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि वैद्यकीय तपासणीही करण्यात आली अशी माहिती दिल्ली विमानतळावरील पोलिसांकडून मिळाली आहे. महाराष्ट्रात प्रवास करण्यासाठी RT-PCR ची गरज नाही महाराष्ट्रातील (Maharashtra) कोणत्याही विमानतळावरून राज्यांतर्गत प्रवास करण्यासाठी RT-PCR चाचणीचा रिपोर्ट असण्याची गरज नाही आहे. मुंबई विमानतळ ते महाराष्ट्रातील कोणत्याही विमानतळांवर प्रवास करणार्‍या सर्व घरगुती विमान प्रवाश्यांसाठी विमानतळ ऑपरेटर  किंवा एअरलाइन्स (Airlines) आरटी-पीसीआर चाचणी विचारत नाहीत.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Airport, Delhi, Mumbai

    पुढील बातम्या