• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • नदी किनारी आढळला बेपत्ता तरुणीचा अर्धवट सांगाडा; प्रिया हत्याकांडात धक्कादायक खुलासा

नदी किनारी आढळला बेपत्ता तरुणीचा अर्धवट सांगाडा; प्रिया हत्याकांडात धक्कादायक खुलासा

नदीच्या किनारी प्रियाचा अर्धवट सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे.

 • Share this:
  उत्तर प्रदेश, 8 ऑक्टोबर : लग्न (Marriage) हे प्रत्येक तरुणीच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण असतात. मात्र हेच आनंदाचे क्षण मिळविण्यासाठी एक तरुणीला जीव गमवावा लागला आहे. धक्कादायक म्हणजे हत्येनंतर महिलेचं धड गायब आहे. त्यामुळे या प्रकरणातही संशय अधिक वाढला आहे. बरेलीतील (Uttar Pradesh Crime News) जोगीनवादा येथील प्रिया या तरुणीच्या हत्या प्रकरणात एक खळबळजनक सत्य समोर आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका महिलेसह चार जणांना अटक केली आहे. आरोपींनी सांगितल्यानुसार, अरिल नदीच्या किनाऱ्यावरुन सांगाडादेखील सापडला आहे. हा सांगाडा प्रियाचा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र हे सत्य अर्धवट असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलीस ज्या सांगाड्याविषयी सांगत आहे तो सांगाड्याच्या नावाखाली केवळ दोन पाय आहेत. जे नदीच्या किनाऱ्यावर पुरले होते. प्रियाच्या कमरेपासून वरील भाग अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे शरीरावरील भाग कुठे आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. प्रियाच्या मृतदेहाचे तुकडे करून पुरण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि पोलिसांचा तपास भरकटवण्यासाठी दुसऱ्या कोणाचा सांगाडा तेथे पुरण्याचाही संशय आहे. 16 जुलै रोजी कामावर जात असल्याचं सांगून 21 वर्षीय प्रिया घराबाहेर पडली होती. यानंतर ती बेपत्ता आहे. 5 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी राजवीर आणि त्याच्या नात्यातील मामा सतेंद्रचे नोकर गोवर्धन यांना अटक केली होती. चौकशीदरम्यान त्यांनी प्रियाचा मृतदेह अरिल नदीच्या किनाऱ्यावर पुरल्याचं सांगितलं. बदायू रोडवरील एका मिठाईच्या दुकानात काम करणाऱ्या राजवीरने प्रियाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं. लग्नाचं आमिष दाखवून तो तिला सराय गावात घेऊन गेला. तेथे मामा सत्येंद्र यांचा पूत्र अजीत याच्यासह लग्नासाठी दबाव आणू लागला. प्रियाने त्यांचं म्हणणं नाकारल्यानंतर राजवीर, सत्येंद्रआणि गोवर्धनने प्रियाचा गळा दाबून हत्या केली. सुरुवातील तिचा मृतदेह शेतात पुरण्यात आला. मात्र जुलैचा महिना असल्याने चांगलाच उन्हाळा होता. त्यामुळे तीन दिवसात मृतदेहातून दुर्गंधी सुटल्यानंतर शेतातून काढून गावाबाहेरील अरिल नदीच्या किनाऱ्यावर पुरण्यात आलं. हे ही वाचा-कारखाना मालकांकडून विवाहितेसोबत विकृतीचा कळस; 31 वर्षांपासून देत होते नरक यातना आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या ठिकाणाहून प्रियाचा सांगाडा बाहेर काढण्यात आला. यासाठी आधी बांध घालावा लागला आणि त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. मात्र तिचा उरलेला मृतदेह कुठे आहे याबाबत पोलिसांकडेही काहीच उत्तर नाही. येथे केवळ प्रियाचे पाय असल्याने कमरेवरील भाग कुठे याचा शोध सुरू आहे. काहींच्या मते प्राण्यांनी तिचा मृतदेह खाल्ला असावा. तर काहींच्या मते तो वाहून गेला असावा. असं असलं तरी त्याचा काही अंश किनाऱ्यावर न सापडल्याने संशय अधिक वाढला आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: