Home /News /crime /

लेकाच्या भवितव्यासाठी उचललं पाऊल; 15 वर्षांच्या मुलाने झोपतच आई-वडिलांची कुऱ्हाडीने केली हत्या

लेकाच्या भवितव्यासाठी उचललं पाऊल; 15 वर्षांच्या मुलाने झोपतच आई-वडिलांची कुऱ्हाडीने केली हत्या

फक्त आई-वडिलांची हत्या करून तो थांबला नाही तर त्याने आपल्या लहान भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले.

    जयपूर, 16 डिसेंबर : राजस्थानमधील (Rajasthan News) हनुमानगड येथून एक धक्कादायक वृत्त (Shocking News) समोर आलं आहे. एका 15 वर्षांच्या मुलाने बुधवारी रात्री आपल्या आई-वडिलांची अत्यंत क्रूरपणे हत्या (Murder) केली. त्याचे आई-वडील खाटेवर झोपले होते. या मुलाने त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करीत झोपेतच त्यांची हत्या केली. याशिवाय त्याने आपल्या लहान भावाच्या डोक्यावरही वार केले. यानंतर भावाला रक्ताळलेल्या अवस्थेत सोडून त्याने तेथून पळ काढला. काही वेळानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी लहान भावाचा श्वासोच्छवास सुरू होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर आई-वडिलांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी हत्या प्रकरणात दाम्पत्याचा अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. याशिवाय रक्ताने माखलेली कुऱ्हाडदेखील ताब्यात घेण्यात आली आहे. 2-3 दिवसांपूर्वी नशामुक्ती केंद्रातून परतला होता.. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीशपाल (42), पत्नी इंद्रा (38) आणि 15 व 14 वर्षांचा मुलगा अजयसोबत राहत होता. 12 बिगे शेतात दाम्पत्य शेती करीत होतं. मात्र त्यांच्या 15 वर्षांच्या मुलाला लहान वयातच नशा करण्याची सवय लागली होती. मुलामुळे त्रस्त झालेल्या पालकांनी त्याला नशा मुक्ती केंद्रात पाठवलं. रात्री साधारण 9 वाजता त्याचे आई-वडील खाटेवर झोपले होते. भाऊ दुसऱ्या खोलीत होता. यादरम्यान अल्पवयीन मुलगा कुऱ्हाड घेऊन आला आणि झोपलेल्या पालकांनी कुऱ्हाडीने वार केले. आरडाओरडा ऐकून छोटा भाऊ धावत आला. तर त्याच्याही डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. यानंतर लहान भाऊ बेशुद्ध झाला. या घटनेत त्याच्या आई-वडिलांचा जागीच मृत्यू झाला. स्वत:च हत्येची दिली माहिती... जवळ राहणाऱ्यांमा त्याने आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याचं सांगितलं. यानंतर लोकही हैराण झाले. त्यांनी घरा जाऊन पाहिलं तर सर्वांना धक्काच बसला. स्थानिकांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी त्याच्या लहान भावाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. आई-वडिलांनी आपल्याला नशा मुक्ती केंद्रात पाठविल्याच्या रागात मुलाने आपल्या आई-वडिलांची हत्या केली होती.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Murder, Rajasthan

    पुढील बातम्या