मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पालकांनी या बाबतीत काळजी घ्यावी, 12 वर्षांच्या मुलाने Mobile मुळे घेतला गळफास; कुटुंबावर शोककळा

पालकांनी या बाबतीत काळजी घ्यावी, 12 वर्षांच्या मुलाने Mobile मुळे घेतला गळफास; कुटुंबावर शोककळा

लहान मुलांमध्ये मोबाइलची (Mobile) सवय इतकी वाढली आहे, की यासाठी ते काहीही करायला तयार आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

लहान मुलांमध्ये मोबाइलची (Mobile) सवय इतकी वाढली आहे, की यासाठी ते काहीही करायला तयार आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

लहान मुलांमध्ये मोबाइलची (Mobile) सवय इतकी वाढली आहे, की यासाठी ते काहीही करायला तयार आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

भोपाळ, 23 डिसेंबर :  लहान मुलांमध्ये मोबाइलची (Mobile) सवय इतकी वाढली आहे, की यासाठी ते काहीही करायला तयार आहेत. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) छिंदवाडामध्ये अशीच एक धक्कादायक घटना (Shocking News) समोर आली आहे. येथे 12 वर्षांच्या मुलाला मोबाइल न दिल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या (Child Suicide) केली. मुलगा आपल्या बहिणीकडून फोन मागत होता, मात्र जेव्हा बहिणीने फोन देण्यास नकार दिला तर रागाच्या भरात त्याने धक्कादायक पाऊल उचललं. (Parents should be more careful 12 year old child strangled due to mobile family in shocked)

मोबाइल दिला नाही म्हणून केली आत्महत्या...

ही घटना बुधवारी छिंदवाडा जिल्ह्यातील कोहका गावात घडली आहे. येथे 12 वर्षांचा मुलगा आपल्या मोठ्या बहिणीसह मोबाइल पाहत होता. त्याची बहिण मोबाइलवर गेम खेळत होती. यादरम्यान भावाने बहिणीकडे मोबाइल मागितला. मात्र तिने देण्यास नकार दिला. यानंतर रागाच्या भरात तो एका खोलीत गेला आणि दार लावून गळफास घेतला.

मुलाला पाहताच बापाला बसला धक्का..

कुटुंबातील सदस्यांनी काही वेळानंतर दार ठोठावलं, तर मुलाचा आवाज ऐकू आला नाही. बराच वेळ कुटुंबीय ओरडत होते. मात्र तरीही काहीच प्रतिक्रिया आली नाही. शेवटी दार तोडून आत गेल्यानंतर मुलाला त्या अवस्थेत पाहताच त्यांना जबर धक्का बसला. मुलाने गळफास घेतला होता. यानंतर त्याला खाली उतरवण्यात आलं आणि तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. या बाबत पोलिसांत माहिती देण्यात आली. आई-वडिलांची रडून रडून बिकट अवस्था झाली आहे. तर दुसरीकडे बहिणीच्या डोळ्यातील अश्रूदेखील थांबत नव्हते.

हे ही वाचा-तरुण-तरुणीनं एकाच झाडाला घेतला गळफास, पुण्यातील धक्कादायक घटना

डॉक्टर म्हणाले की..

अशा प्रकारच्या घटना अचानक होत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनांचा मागोवा घेतला तर नेमकी स्थितची लक्षात येईल. किशोवस्थेत मुलांच्या वागणुकीत बदल दिसून येत असतो. त्यांना छोट्या छोट्या गोष्टींमुळे राग येतो. तर कधी ते खूप आनंदी होतात. काही मुलं खेळात खेळात असं पाऊल उचलतात. या परिस्थितीत हार्मोनल बदल होतात. मात्र जागरुकतेमुळे लोक ते समजू शकत नाहीत.

First published:

Tags: Madhya pradesh, Mobile, Suicide