बुलंदशहर, 31 डिसेंबर : कोरोना दरम्यान लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान गेल्या 7 ते 8 महिन्यांनी अनेक ठिकाणी शाळा सुरू होत आहे. त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहावीच्या वर्गातील दोन विद्यार्थ्यांमध्ये वर्गात बसण्यावरुन वाद झाला. हा वाद इतका टोकाला पोहोचला की यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. (10th grader at school shot a classmate )
मिळालेल्या माहितीमुसार बुलंदरशहर भागातील एका शाळेतील दहावीच्या वर्गातील दोन मुलांमध्ये बसण्यावरुन वाद झाला. 14 वर्षीय मुलांमध्ये झालेल्या या वादातून एका विद्यार्थ्याचा जीव गेला आहे. यातील एका विद्यार्थ्याने आपल्या वर्गातील एका मुलाची गोळी घालून हत्या केली. या विद्यार्थ्याचे काका सैन्यात नोकरी करतात. (10th grader at school shot a classmate ) ते सुट्टीवर घरी आले होते. त्याचा फायदा घेत विद्यार्थ्याने काकाची परवानाधारक बंदुक चोरी केली व शाळेत आणली. दरम्यान वर्गमित्रासोबत झालेल्या वादात विद्यार्थ्याचा पारा चढला व रागाच्या भरात त्याने बॅगेत आणलेली बंदुक काढली व वर्गमित्राला गोळी घातली. या हत्यात दुसऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला.
कल स्कूल में कक्षा 10 के दो छात्रों के बीच क्लास में बैठने को लेकर हुई कहासुनी में 14 वर्षीय छात्र ने अपने सहपाठी को गोली मार कर हत्या कर दी। अभियुक्त छात्र के चाचा फौज में नौकरी करते हैं जो छुट्टी पर घर आए हुए है, उनकी लाइसेंसी बंदूक को चोरी कर छात्र स्कूल लाया था: SSP बुलंदशहर pic.twitter.com/SvTBPCA37s
हा प्रकार समोर आल्यानंतर शाळेत खळबळ उडाली आहे. मुलांकडे अशा प्रकारची शस्त्र कशी येऊ शकतात व पालकांनी याकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे पालकांनी मुलांच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त केली आहे. बुलंदरशहर भागातील पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.