तरुणीने सेल्फी काढून घेतला गळफास, सुसाईड नोटमधून झाला खळबळजनक खुलासा

तरुणीने सेल्फी काढून घेतला गळफास, सुसाईड नोटमधून झाला खळबळजनक खुलासा

महिलेनं स्वत:ला संपवण्याआधी एक सुसाईट नोटही लिहिली आहे, ज्यामधून धक्कादायक खुलासा झाला आहे.

  • Share this:

चंदीगढ, 21 मार्च : एका नवविवाहित तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना छत्तीसगढमधील अंबिकापुर इथं घडली आहे. आत्महत्या करण्याआधी या महिलेनं रडत-रडत एक सेल्फी काढल्याचंही समोर आलं आहे. महिलेनं स्वत:ला संपवण्याआधी एक सुसाईट नोटही लिहिली आहे, ज्यामधून धक्कादायक खुलासा झाला आहे.

पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे मी आत्महत्या करत असल्याचं तरुणीने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. तसंच माझा पती मलाही सोडत नव्हता आणि त्या दुसऱ्या मुलीलाही, असा आरोप केला आहे. मृत्यूनंतर माझा मृतदेह माझ्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात यावा, असंही आत्महत्या केलल्या तरुणीने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

घुटरापारा इथं राहणाऱ्या प्रिया सोनी यांचा 5 वर्षांपूर्वी सौरभ या युवकासोबत विवाह झाला होता. प्रिया ही बुधवारी घरी एकटी असताना तिने टोकाचा निर्णय घेतला. कुटुंबातील इतर सदस्य घरी पोहोचले तेव्हा त्यांना प्रियाचा मृतदेह आढळला. याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी तिथं एक सुसाईड नोट हाती लागली. प्रियाला तिचा पती आणि घरातील इतर सदस्य सतत मारहाण करत होते, असा दावा प्रियाच्या वडिलांनी केला आहे.

सुसाईड नोटमध्ये प्रियाने लिहिलं...

'आज मी सौरभ आणि जूलीमुळे आत्महत्या करत आहे. कारण सौरभने माझं आयुष्य उद्धवस्त केलं. तो मला सोडून देत नव्हता आणि जूलीलादेखील आणि मी असं जगू शकत नाही. म्हणून मी हे पाऊल उचलत आहे. सौरभ आणि जूलीवर कारवाई करण्यात यावी, अशी माझी अखेरची इछ्चा आहे,' असं प्रिया हिने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2020 03:24 PM IST

ताज्या बातम्या