मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /15 दिवसांच्या मैत्रीने दिली आयुष्यभराची वेदना, विद्यार्थिनीवर गॅंगरेप करून अर्धनग्न अवस्थेत फेकले

15 दिवसांच्या मैत्रीने दिली आयुष्यभराची वेदना, विद्यार्थिनीवर गॅंगरेप करून अर्धनग्न अवस्थेत फेकले

 15 दिवसांपूर्वी 'इंस्ट्राग्राम'वर तिची आरोपी आशीषशी मैत्री झाली होती. काही दिवस दोघे चॅटिंग करत होते.

15 दिवसांपूर्वी 'इंस्ट्राग्राम'वर तिची आरोपी आशीषशी मैत्री झाली होती. काही दिवस दोघे चॅटिंग करत होते.

15 दिवसांपूर्वी 'इंस्ट्राग्राम'वर तिची आरोपी आशीषशी मैत्री झाली होती. काही दिवस दोघे चॅटिंग करत होते.

पाणिपत,26 जानेवारी: एका 14 वर्षीय मुलीला 'इंस्ट्राग्राम'वर मैत्री करणे चांगलंच महागात पडलं आहे. दोन तरुणांनी तिला फ्रुटीमधून मद्य पाजून कारमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर नराधमांनी पीडितेला अर्धनग्न अवस्थेत फेकून दिले. पीडित मुलगी 11 वीचा विद्यार्थिनी आहे. तिची आणि नराधमांची 'इंस्ट्राग्राम'वर मैत्री झाली होती.नराधमांनी पीडितेला मॉडल टाऊन येथील डीएव्ही पार्कजवळ भेटायला बोलावले होते. मुलगी डीएव्ही पार्कजवळ पोहोचताच नराधमांनी तिला कारमध्ये बसवले. कारमध्ये तिला जबरदस्तीने मद्य पाजले. नंतर तिला जवळपास तीन तास कारमध्ये फिरवले. एक कालव्याजवळ कार थांबवून दोन्ही नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. नंतर पीडितेला डीएव्ही पार्कजवळ अर्धनग्न अवस्थेत फेकून दिले. आरोपी पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी त्यांना पकडले.

पीडितेवर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी (24 जानेवारी) सायंकाळी 7.30 वाजता ही घटना घडली. रात्री उशीरा पीडित मुलगी शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवली. मॉडल टाऊन पोलिस स्टेशनचे एसएचओ सुनील कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणे रवीन्द्रा हॉस्पिटलमागे राहणारा आशीष सेखू चौहान (वय-19, रा. सतकरतार कॉलनी) वीशू संदीप (वय-20,) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

15 दिवसांच्या मैत्री दिला आयुष्यभराची वेदना

जाटल रोडवरील एक कॉलनीत राहणारी पीडिता 11वीची विद्यार्थिनी आहे. 15 दिवसांपूर्वी 'इंस्ट्राग्राम'वर तिची आरोपी आशीषशी मैत्री झाली होती. काही दिवस दोघे चॅटिंग करत होते. नंतर दोघांनी एकमेकांन आपापले मोबाइल नंबर शेअर केले. पीडितेला 15 दिवसांच्या मैत्रीने आयुष्यभराची वेदना दिली आहे.

ट्यूशनला न जात आरोपीला भेटायला गेली होती मुलगी..

आरोपी आशीष याने शुक्रवारी सायंकाळी पीडितेला डीएव्ही पार्कजवळ भेटायला बोलवलं होतं. ट्यूशनला न जाता ती स्कूटी घेऊन पार्कच्या गेटजवळ पोहोचले. आशीष आणि वीशू कार घेऊन तिथे आधीच पोहोचले होते. दोघांनी तिला पार्कबाहेर स्कूटी लावायला सांगितली. नंतर तिला कारमध्ये बसवले. दोघांनी तिला फ्रूटीमधून मद्य पाजले. मुलीने शुद्ध हरपली. नंतर नराधमांनी एका कालव्याजवळ कार थांबवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

First published:

Tags: Crime, Crime case, Gang rape, Girl rape, Instagram, Panipat