पंढरपूर मर्डर मिस्ट्री, कार सापडल्याने खून प्रकरणातील वाढला सस्पेन्स

पंढरपूर मर्डर मिस्ट्री, कार सापडल्याने खून प्रकरणातील वाढला सस्पेन्स

या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्यास सुरुवात झाली आहे.

  • Share this:

वीरेंद्रसिंह उत्पात, पंढरपूर, 20 जानेवारी : माढा तालुक्यातील लऊळ हद्दीत झालेल्या कृषी सहायक अंगद घुगे खुनाचा तपास कुर्डुवाडी पोलीस करत आहेत. या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्यास सुरुवात झाली आहे. संशयित मारेकऱ्यांनी या कामात वापरलेली पांढरी कार ( एम.एच12/ई एक्स 7778) या पथकाने रविवारी मध्यरात्री बार्शी येथून जप्त केली आहे.

बार्शीतून कार जप्त केल्यानंतर पोलीस पथकाने त्याची झडती घेतली. दरम्यान कारमध्ये सीटवर आणि आतील भागावर रक्ताचे डाग आढळून आले आहेत. पोलिसांनी याचे नमुने घेतले असून ते प्रयोगशाळेला पाठवले जात असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारमुळे पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे.

धक्कादायक! बसमध्ये चिमुकलीवर विनयभंग करून व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅप STATUS वर केला अपलोड

कृषी सहाय्यक अंगद घुगे हे मंगळवारपासून बेपत्ता होते. कुटुंबातील लोकांनी बार्शी किंवा इतर पोलीस ठाण्यात 'मिसिंग' तक्रार का दाखल केली? या अंगानेही पोलीस कसून चौकशी करीत आहेत. ती चौकशी करीत असताना बार्शीत संशयितरित्या कार आढळली. तपासादरम्यान खून प्रकरणात तीन ते पाच आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

प्रेमसंबंधातून दोघांची आत्महत्या? अल्पवयीन तरुणीच्या सुसाईड नोटमध्ये मास्तरांचं नाव!

खुनानंतर मृतदेह लऊळ हद्दीत आणून निर्मनुष्य ठिकाणी माळरानावर जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. ‌या परिसरातील किंवा तालुक्यातील माहितगार आरोपी यामध्ये सामील असावा, हा धागा पकडून पोलीस तपास करत आहेत.

First published: January 20, 2020, 11:33 AM IST

ताज्या बातम्या