पालघर, 18 नोव्हेंबर: तलासरी तालुक्यातील झाई बोरिगाव ग्रामपंचायती अंतर्गत मोरेपाडा गावच्या पोलीस पाटलाला अर्धनग्न करून महिलांनी खडसावलं. त्याच्यावर आदिवासी महिलांना अश्लील शिव्या देऊन मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. मोरेपाडा या पाड्यावरील आदिवासी महिलांना मागील काही दिवसांपासून गावचा पोलीस पाटील अश्लील भाषेत शिवीगाळ करीत होता. या मानसिक त्रासाने या आदिवासी महिला कमालीच्या अस्वस्थ होत्या.