मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पालघर साधू हत्याकांडातील 47 आरोपींना जामीन मंजूर

पालघर साधू हत्याकांडातील 47 आरोपींना जामीन मंजूर

 या प्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई करत 200 हुन अधिक संशयितांना ताब्यात घेतले होते. तर 100 हुन अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

या प्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई करत 200 हुन अधिक संशयितांना ताब्यात घेतले होते. तर 100 हुन अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

या प्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई करत 200 हुन अधिक संशयितांना ताब्यात घेतले होते. तर 100 हुन अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

  • Published by:  sachin Salve
पालघर, 08 डिसेंबर : पालघरमध्ये डहाणू तालुक्यात गडचिंचले परिसरात दोन साधू आणि ड्रायव्हरची जमावाने हत्या  (palghar mob lynching case) केली होती. या प्रकरणातील 47 आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पालघरमध्ये साधू हत्याकांडामुळे देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई करत 200 हुन अधिक संशयितांना ताब्यात घेतले होते. तर 100 हुन अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. न्यायालयाने याआधी संशयित आरोपींना जामीन मंजूर केला होता. ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.पी. जाधव यांनी 47 जणांना गुरुवारी जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी 7 ऑक्टोबर रोजी  राज्य सरकारकडून  सुप्रीम कोर्टात नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांवर काय कारवाई करण्यात आली, याची माहिती देण्यात आली आहे. या रिपोर्टमध्ये राज्य सरकारने या प्रकरणात पोलिसांवर काय कारवाई केली याची माहिती दिली आहे. तसंच 15 पोलिसांना पगारामध्ये कपात करण्याची शिक्षा देण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली. काय आहे प्रकरण? 16 एप्रिल 2020 रोजी  कांदिवली येथील सुशीलगिरी महाराज, वाहन चालक निलेश तेलगडे आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिराचे पुजारी कल्पवृक्षगिरी महाराज हे लॉकडाउनच्या काळात गुजरातकडे चालले होते.  चालकाची त्यांच्याकडे प्रवासाठीचा कोणताही पास नसल्याने त्यांना चारोटी टोलनाका येथून पोलिसांनी माघारी पाठवले. म्हणून ते माघारी फिरून आड मार्गाने विक्रमगडहून जव्हार-दाभाडीमार्गे दादरा नगर हवेलीच्या हद्दीवर असलेल्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास पोहचले.  मात्र, त्याठिकाणी वनविभागाच्या चौकीजवळ जमलेल्या एका जमावाने या तिघांची गाडी अडवली आणि चोर समजून दगड, कोयते, काठ्यांनी मारण्यास सुरूवात केली. जमावानं त्यांची कारही पलटी केली. गार्डने प्रसंगावधान राखून पोलिसांना सूचना दिली. रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास पोलीस आपल्या गाडीसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या तिघा जखमींना कारमध्ये बसवून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमाव शेकडोंच्या संख्येने असल्याने तिथं उपस्थित चार पोलिसांचे काहीच चालले नाही. जमाव अधिकच आक्रमक झाला आणि त्यांनी थेट पोलिसांवरही हल्ला चढवला. या घटनेतून पोलिसांनी कशीबशी आपली सुटका करून घेतली. मात्र, त्या तीन जणांची जमावाने दगड, काठ्या, कोयत्याने वार करुन निर्घृणपणे हत्या केली. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले होते.
First published:

पुढील बातम्या