Home /News /crime /

'कॉल गर्ल'साठी फोन करणं पडलं महागात, स्वत:च्या बायकोचाच फोटो SEX वर्करच्या पेशात झाला व्हायरल

'कॉल गर्ल'साठी फोन करणं पडलं महागात, स्वत:च्या बायकोचाच फोटो SEX वर्करच्या पेशात झाला व्हायरल

तरुणाच्या पत्नीचा फोटो एडिट करून सेक्स वर्करच्या पेशात एका डेटिंग अ‍ॅपवर टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    पालघर, 7 डिसेंबर : मसाज करण्यासाठी फोनवरून कॉल गर्लची चौकशी करणं 30 वर्षीय तरुणाला चांगलंच महागात पडल्याची पडलं आहे. मसाजसाठी कॉल गर्लची चौकशी केल्यानंतर समोरच्या व्यक्ती थेट 50 हजारांची मागणी केली. मात्र इतके पैसे देण्यास तरुणाने नकार देताच समोरच्या व्यक्तीने तरुणाच्या पत्नीचा फोटो एडिट करून सेक्स वर्करच्या पेशात एका डेटिंग अ‍ॅपवर टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईजवळील पालघरमध्ये एका तरुणाने 14 डिसेंबरला मसाज सेवेच्या चौकशीसाठी एका व्यक्तीला फोन केला. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने पीडित तरुणाला थेट 50 हजारांची मागणी केली. इतके पैसे देणं शक्य नसल्याने त्या तरुणाने नकार दिला. मात्र पैशासाठी त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी समोरच्या व्यक्तीने थेट तरुणाच्या सोशल मीडिया अकाउंटवर जात त्याच्या पत्नीचा फोट घेतला. हा फोटो एका पॉर्नस्टारच्या फोटोसोबत मॉर्फ करून एका डेटिंग अ‍ॅपवर प्रसिद्ध केला. तसंच पीडित तरुणाऱ्या पत्नीचा सेक्स वर्कर असा उल्लेखही केला. आरोपीने व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली डेटिंग अ‍ॅपची लिंक व्यवसायाने ज्वेलरी डिझायनर असणारा पीडित तरूण पालघरमध्ये राहात असून तो अंधेरी इथं काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पीडित तरुणाला 16 डिसेंबरला व्हॉट्सअ‍ॅपवर एका डेटिंग अ‍ॅपची लिंक मिळाली. या लिंकमध्ये चक्क त्या तरुणाच्या पत्नीचा एका पॉर्नस्टारच्या फोटोसोबत मॉर्फ केलेला फोटो होता. तसंच तिचा उल्लेख सेक्स वर्कर असा केलेला होता.' दरवाजा उघडताच वहिनी ओरडली, कुटुंबातील 5 जण पडले होते रक्ताच्या थारोळ्यात आरोपीला पकडण्यासाठी आता पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. 'आम्ही आता तो मोबाईल नंबर ट्रॅक करत आहोत, ज्यावरून आरोपीने पीडित तरुणाला डेटिंग अ‍ॅपची लिंक पाठवली होती. हा आरोपी ऑनलाइन सेक्स चॅट आणि सेक्स वर्कर सर्च करणाऱ्या टोळीत सहभागी असल्याचा आम्हाल संशय आहे. अशी टोळी तरुणांनी फोन केल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडे पैस उकळते,' अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 'मला 5 मुलींचा फोटो पाठवला आणि...' मी मसाजबाबत चौकशी करण्यासाठी 14 डिसेंबरला फोन केला होता. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने मला पाच मुलींचे फोटो पाठवले. तसंच यापैकी एका मुलीची निवड करून मला चर्चगेटजवळ एका सर्व्हिस सेंटरच्या इथं मुलीला नेण्यासाठी बोलावलं. मात्र मी नकार दिल्यानंतरही आरोपीने माझ्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर मी लगेच फोन केला, कारण माझ्यासाठी ही रक्कम खूप मोठी होती,' असं पीडित तरुणाने पोलीस तक्रार दाखल करताना म्हटलं आहे. दरम्यान, आता पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Crime, Mumbai, Palghar

    पुढील बातम्या