62 वर्षीय आईची वेदनेतून मुक्तता करण्यासाठी मुलानं केली हत्या

62 वर्षीय आईची वेदनेतून मुक्तता करण्यासाठी मुलानं केली हत्या

धक्कादायक! डोक्यात घातला लोखंडी रॉड, मुलानेच केली वृद्ध आईची हत्या

  • Share this:

पालघर, 31 डिसेंबर: डोक्यात रॉड घालून 62 वर्षीय आईची पोटच्या मुलानंच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी सकाळी पालघर जिल्ह्यातील तारापूर इथे हा प्रकार घडला. 62 वर्षीय आईला आजारपणामुळे होणाऱ्या वेदनांपासून मुक्तता मिळवी यासाठी मुलानं डोक्यात रॉड घालून हत्या केली आहे. तारापूर इथे असलेल्या भाभा ऑटोमिक पावर स्टेशन कॉलनीत रविवारी सकाळी हा प्रकार घडला. आईवर उपचार करण्याऐवजी आईच्या आजारपाणातून तिची हत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.

हत्येप्रकरणी 30 वर्षीय जयप्रकाश धीबीविरोधात पालघर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राकेश पगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन मुलं आईपासून वेगळे भोईसर इथे राहात होते. दर रविवारी हे दोघं भाऊ आपल्या आई-वडिलांना पाहण्यासाठी भेटण्यासाठी घरी जायचे. चंद्रवती या मधुमेह, रक्तदाब, मोतीबिंदूसारख्या आजारानी त्रस्त होत्या. 29 डिसेंबरला जयप्रकाश आईला भेटण्यासाठी गेला होता. आई त्याच्यासाठी स्वयंपाकघरात नाश्त्याची तयारी करत होत्या. जयप्रकाशने संधी साधून आईच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. चंद्रवती म्हणजे जयप्रकाशच्या आईचा जागीच मृत्यू झाला. छोट्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी जयप्रकाशला अटक केली आहे.

वाचा-VIDEO 'त्या' कथित 'पछाडलेल्या' घरात आता राहतं 'हे' कुटुंब

दरम्यान हत्येनंतर जयप्रकाश आईच्या मृतदेहाजवळ बसून होता. आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. दरम्यान हा सगळा प्रकार भावाने पाहिला आणि त्याने घटनेची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घर सील केलं असून लहान भावाने दिलेल्या फिर्यावरून आरोपी जयप्रकाश विरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलं आहे.

आई सतत आजारी असायची या आजारातून तिला कायमचं मुक्त करण्यासाठी हत्या केल्याचं आरोपीनं पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितलं. पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चंद्रावती यांचा मृतदेह शविच्छेदनासाठी पाठण्यात आला आहे.

वाचा-लग्नानंतर 7 महिन्यांतच तरुणाची आत्महत्या, पुण्यात बायकोविरुद्ध गुन्हा दाखल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2019 10:44 AM IST

ताज्या बातम्या