Home /News /crime /

ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचा काळाबाजार; बड्या रेस्टॉरंट चालकाला अटक

ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचा काळाबाजार; बड्या रेस्टॉरंट चालकाला अटक

ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचा काळाबाजार प्रकरणात मुख्य आरोपी असणाऱ्या नवनीत कालराला (Navneet kalara Arrest) पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. संबंधित आरोपीच्या मालकीच्या हॉटेलमधून शेकडो ऑक्सिजन कंसंस्ट्रेटर यापूर्वीच जप्त करण्यात आले आहेत.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 17 मे: कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus 2nd wave) आपलं उग्र रुप धारण करत असताना, देशात वैद्यकीय सामानांचा (Medical equipment) काळाबाजारही (black market) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी दिल्लीतील काही बड्या रेस्टॉरंटवर छापे (raid at Restaurant) टाकून मोठ्या संख्येनं ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर जप्त (Oxygen Concentrator) केले होते. याप्रकरणी फरार असलेले मुख्य आरोपी नवनीत कालराला (Navneet kalara Arrest) पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. आरोपी कालरानं अटकपूर्व जामीनसाठी हायकोर्टांत धाव घेतली होती. मात्र त्याला कोर्टानं दिलासा दिला नव्हता. तेव्हापासून फरार असणाऱ्या आरोपी कालराला अखेर दिल्ली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नेमकं प्रकरण काय आहे? काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचा काळाबाजार रोखण्यासाठी दिल्लीतील विविध हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये छापे टाकले होते. यामध्ये खान चाचा रेस्टॉरंट आणि लोधी कॉलनीतील नेगे जू रेस्टॉरंटचाही समावेश होता. यावेळी संबंधित रेटॉरंटमधून पोलिसांनी शेकडो ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर जप्त केले होते. याप्रकरणी अटकेची टांगती तलवार रेस्टॉरंटचालक नवनीत कालरा यांच्यावर होती. त्यामुळे त्यानं न्यायालयाच धाव घेऊन अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. पण यावेळी न्यायालयानं त्याच्या अर्ज फेटाळून लावत, चौकशी गरजेची असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आरोपी नवनीत कालरा फरार झाला होता. आरोपी नवनीत कालराला या प्रकरणाचा म्होरक्या मानलं जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लंडन येथील रहिवासी असणाऱ्या मॅट्रिक्स सेल्युलर कंपनीचे मालक गगन दुग्गल यानं ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचा काळाबाजार करण्याची योजना आखली होती. यानंतर हे ऑक्सिजन कंसंस्ट्रेटर नवनीत कालरा यांच्या हॉटेलमध्ये ठेवून चढ्या दरात विकले जात होते. गगन दुग्गलच्या कंपनीचे भारतातील सीईओ गौरव खन्नाही या काळाबाजारात गुंतले असल्याची माहिती समोर येत आहे. हे ही वाचा-ब्रुक फार्मावर गुजरातमध्येच काळाबाजार केल्याची केस, आव्हाडांचा पुराव्यानिशी भाजपवर पलटवार असं असलं तरी गौरव खन्नाला अटकपूर्व जामीन देण्यात आला आहे. पण नवनीत कालरा याचा जामीन न्यायालयानं फेटाळून लावला होता. दरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई करत काल रविवारी मुख्य संशयित आरोपी नवनीत कालराच्या मुसक्या आवळल्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Delhi

    पुढील बातम्या