मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

खाण्यासाठी भात अन् चुना, निर्वस्त्र करून मारहाण; अंधश्रद्धेतून मोलकरणीची केली भयंकर अवस्था

खाण्यासाठी भात अन् चुना, निर्वस्त्र करून मारहाण; अंधश्रद्धेतून मोलकरणीची केली भयंकर अवस्था

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पीडित महिलेचे वय 43 आहे. ती आपल्या परिवारासह सातबारीच्या अंसल व्हिला येथे असलेल्या एका घरात राहते.

    दिल्ली, 15 ऑगस्ट : दक्षिण दिल्लीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तांत्रिकाच्या म्हणण्यावर घरातील कामवाल्या महिलेला चोर समजून निर्वस्त्र करण्यात आले. तसेच तिला जोरदार मारहाण करण्यात आली आहे. 10 महिन्यांपूर्वी घरात झालेल्या चोरीची माहिती घेण्यासाठी आरोपींनी एका तांत्रिकाला बोलावले होते. यावेळी तंत्र-मंत्रानंतर तांत्रिकाने पीडितेवर चोरी केल्याचा आरोप लावला होता. काय आहे संपूर्ण प्रकरण - तांत्रिकाच्या म्हणण्यावर घरातील कामवाली महिलेला शिक्षा निश्चित करण्यात आली. शिक्षा म्हणून महिलेला विवस्त्र करून खोलीत कोंडून मारहाण करण्यात आली. या नामुष्कीला कंटाळून महिलेने उंदीर मारण्याचे औषध खाल्ले आणि तिची प्रकृती खालावली. आरोपींनी लगेचच तिला रुग्णालयात दाखल केले. तर घटनेची माहिती मिळताच मैदनगढ़ी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पीडितेचे जबाब नोंदवून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे वय 43 आहे. ती आपल्या परिवारासह सातबारीच्या अंसल व्हिला येथे असलेल्या एका घरात राहते. येथे ती गेल्या दोन वर्षांपासून घरगुती काम करत होती. मात्र, 10 महिन्यांपूर्वी या घरात चोरी झाली होती. यामुळे 9 ऑगस्टला चोरीचा तपास लावण्यासाठी एका तांत्रिकाला बोलवण्यात आले होते. त्याने आपली तंत्रक्रिया सुरू केल्यावर मालकिणीला भात-चुना दिला आणि घरातील सर्व नोकरांना खायला सांगितले. तांत्रिक म्हणाला- ज्याचे तोंड खाऊन लाल होईल, त्यानेच चोरी केली आहे. यानंतर भात खाल्ल्यावर घरातील कामवाली महिलेचा चेहरा लाल झाला. त्यामुळे तिला दोषी मानले गेले आणि घरातील लोकांनी बेदम मारहाण केली. हेही वाचा - पहाटे 3 वा. उठला; 6 महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा चिरला गळा, सकाळी म्हणाला... इतकेच नाही तर तिला नग्न करून 24 तासांहून जास्त वेळ एका खोलीत ओलीस ठेवले. 10 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पीडित मुलगी शौचाच्या बहाण्याने बाथरूममध्ये गेली आणि तिथे तिने उंदीर मारण्याचे औषध खाल्ले. याप्रकरणी पोलिसांनी 11 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपींवर कमी शिक्षेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्याचा आरोप आता पीडितेच्या नातेवाईकांनी पोलिसांवर केला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Delhi News, Robbery

    पुढील बातम्या