Home /News /crime /

तरुणाच्या मृत्यूनंतर तरुणांच्या संतापाचा उद्रेक, उदगीरमध्ये तुफान दगडफेक

तरुणाच्या मृत्यूनंतर तरुणांच्या संतापाचा उद्रेक, उदगीरमध्ये तुफान दगडफेक

उदगीर शहरात पैश्यांच्या देवाण घेवाणीवरून दोन गटात हाणामारीत जखमी झालेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

    लातूर, 19 जानेवारी : लातूर (Latur) जिल्ह्यातल्या उदगीर शहरात पैश्यांच्या देवाण घेवाणीवरून दोन गटात तुफान हाणामारीची घटना समोर आली होती. या हाणामारीत जखमी झालेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह हा पोलीस ठाण्यासमोर ठेवला आहे. तसंच उदगीर शहरात तुफान दगडफेक केली. उदगीर शहरात पैश्यांच्या देवाण घेवाणीवरुन काही दिवसांपूर्वी दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. या हाणामारीत शफी अहमद  हा 32 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान या युवकाचा  आज मृत्यू झाला. 'आप'ला महाराष्ट्र! ग्राम पंचायत निवडणुकीत AAP ला लॉटरी; 50 टक्के जागांवर यश त्यामुळे मृत शफी अहमदच्या कुटुंबीय आणि मित्रांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्याच्या मृत्यनंतर काही संतप्त तरुणांनी शहरात काही वाहनांवर दगडफेक केली. यात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. तर स्थानिक लोकं जखमी झाली.  दरम्यान, मयताच्या नातेवाईकांनी मयताचे प्रेत पोलिस ठाण्याच्या दारात ठेवत आरोपींना अटक करण्याची मागणी केली. या घटनेमुळे शहरात एकच गोंधळ उडाला होता. 'अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे' असं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक हिंम्मत जाधव यांनी केले. पहिल्यांदाच समोर आला शाहिदच्या पत्नीचा BOLD लुक; मीरा राजपूरतचे PHOTOS व्हायरल तसंच, आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल असं मयताच्या नातेवाईकांना आश्वासन दिल्यानंतर तणाव काहीसा निवळला. खबरदारी म्हणून  उदगीर शहरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या