• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • 'तू मेरी नही हुई तो...' म्हणत विकृत तरुणाने चाकूने कापले तरुणीचे ओठ, भिवंडी हादरली

'तू मेरी नही हुई तो...' म्हणत विकृत तरुणाने चाकूने कापले तरुणीचे ओठ, भिवंडी हादरली

मुलीचा या प्रेमाला विरोध होता. सदर मुलगी आपल्या प्रेमाला विरोध करते म्हणून मुक्तारने मुलीस अनेक धमक्या देखील दिल्या होत्या.

  • Share this:
भिवंडी, 13 एप्रिल : भिवंडी (Bhiwandi) शहरात गुन्हेगारीत वाढ होत असतानाच एकतर्फी प्रेमातून विकृत तरुणाने साथीदाराच्या मदतीने चाकूने (knife attack) तरुणीचे ओठ कापल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुणी जखमी झाल्याने तिला उपचारासाठी मुंबईच्या केईएम रुग्णालयात (KEM Hospital) दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपी तरुणासह त्याच्या साथीदार मित्रावर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्तार अब्दुल रहीम अंसारी ( वय 23 , रा . किडवाई नगर) व शाहिद असे गुन्हा दाखल झालेल्या विकृत तरुणांची नवे आहेत. मुक्तार अंसारी याचे शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असलेल्या एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. मागील एका वर्षांपासून मुक्तार हा पीडित तरुणीला त्रास देत होता. मात्र मुलीचा या प्रेमाला विरोध होता. सदर मुलगी आपल्या प्रेमाला विरोध करते म्हणून मुक्तारने मुलीस अनेक धमक्या देखील दिल्या होत्या. 'तू मेरी नही हुई तो मै तुझे किसी और के लायक नही छोडूंगा' अशी धमकी देखील या विकृत तरुणाने पीडित मुलीला दिली होती. भयंकर! यवतमाळमध्ये शासकीय रुग्णालयात जागाच मिळेना, रुग्ण हॉस्पिटलबाहेर झोपून 9 एप्रिल रोजी पीडित तरुणी सकाळी घराबाहेर पडली असता मुक्तार व त्याच्या साथीदाराने तिला गाठले. त्यावेळी मुक्तारच्या साथीदाराने मुलाला जबरदस्तीने पकडून ठेवले असता मुक्तारने मुलीचा नकाब खेचला व आपल्या हातातील चाकूने मुलीच्या ओठांवर वर करत ओठ कापले. या हल्ल्यात मुलीच्या ओठांना मोठी जखम झाली आहे. जखमी अवस्थेत मुलीला उपचारासाठी सुरुवातील शहरातील  इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. Air India च्या विक्रीच्या हालचालींना वेग; सरकार उपकंपन्याही विकण्याच्या विचारात मात्र, जखम मोठी असल्याने पुढील उपचारासाठी तिला ठाणे येथील कळवा रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, ओठांवर सर्जरी करण्याची आवश्यकता असल्याने डॉक्टरांनी तिला मुंबईच्या केईएम रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला असता सध्या तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी मुक्तार व त्याचा साथीदार शाहिद या दोघांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून हे दोघेही आरोपी फरार झाले असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सुप्रिया जाधव करीत आहेत.
Published by:sachin Salve
First published: