मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /लॉकडाऊनमध्ये पत्नी चवळीची शेंग होईल म्हणून Online औषधांची ऑर्डर; लागला साडे चार लाखांना चुना

लॉकडाऊनमध्ये पत्नी चवळीची शेंग होईल म्हणून Online औषधांची ऑर्डर; लागला साडे चार लाखांना चुना

वजन तर काही कमी झालं नाही उलटपक्षी ती आजारी पडली.

वजन तर काही कमी झालं नाही उलटपक्षी ती आजारी पडली.

वजन तर काही कमी झालं नाही उलटपक्षी ती आजारी पडली.

लखनऊ, 15 मार्च : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) गाजियाबादमध्ये फसवणुकीचा (Fraud) एक विचित्र प्रकार समोर आला आहे. वजन कमी करण्यासाठी एका दाम्पत्याने ऑनलाइन औषधं ऑर्डर केली होती. यामुळे ती बारीक तर झाली नाही, मात्र आजारी पडली. जेव्हा दाम्पत्याने त्यांच्याकडून पैसे परत मागितले तर आरोपींनी कधी फाइल चार्ज तर कधी दुसऱ्या वस्तूंच्या नावाने त्यांच्याकडून साडे चार लाख रुपये घेतले. तेव्हा कुठे दाम्पत्याला त्यांच्यासोबत फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी या प्रकरणात सोमवारी रात्री तिघांविरोधात गुन्हा दाखल केला.

दिव्य आयुर्वेद कंपनी सांगून केला होता कॉल...

न्यू विजयनगर सेक्टर-11 निवासी दुष्यंत सेनीने या प्रकरणात दिव्य आयुर्वेद कंपनीची योगिता, राम सहाय शर्मा आणि गुरदीपच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दुष्यंतनुसार, तो एका प्रायव्हेट कंपनीत जॉब करतो आणि वर्क फ्रॉम होम सुरू होता. जानेवारीत त्यांना कथित दिव्य आयुर्वेद कंपनीतून योगिताचा फोन आला. त्यांनी स्वत: डॉक्टर असल्याचं सांगितलं आणि फॅट्स कमी करणाऱ्या औषधांचं पॅकेज सांगितलं. याचा काहीच उपयोग झाला नाही तर पैसे परत मिळतील असंही तिने यावेळी सांगितलं.

हे ही वाचा-काळीज चिरणारा आवाज अन् खेळ खल्लास; चिमुकल्याच्या एका चुकीमुळे आईचा भयावह शेवट

23,700 औषधं मागवली, फाइल चार्जमध्ये लाखोंची वसुली...

दुष्यंतने सांगितलं की, जानेवारीच्या विविध तारखांमध्ये त्यांनी 23,700 रुपये ऑनलाइन औषधं मागवली. औषधं खाल्ल्यानंतर दुष्यंत आणि त्यांची पत्नी आजारी झाले. हाता-पायांना सूज आली. दुष्यंतने क्लेम करीत पैसे मागितले तर कथित आरोपींनी फाइल चार्जच्या रुपात तब्बल 30 वेळा 4 लाखांहून अधिक रक्कम ऑनलाइन मागवली.

दुष्यंतने जेव्हा विरोध केला तर सांगितलं की, त्यांना आधीचे पैसे मिळणार नाहीत. यासाठी फाइल चार्ज आणि त्याचा प्रोसेस पूर्ण करण्यास सांगितलं. दुष्यंतने सांगितलं की, आतापर्यंत त्यांच्या साडे चार लाख रुपयांना चुना लावण्यात आला आहे.

First published:

Tags: Online fraud, Weight loss