मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक, बंदी असलेल्या गर्भपात गोळ्यांची भिवंडीत खुलेआम विक्री

धक्कादायक, बंदी असलेल्या गर्भपात गोळ्यांची भिवंडीत खुलेआम विक्री

राज्य सरकारने  गर्भलिंगनिदान आणि असुरक्षित महिलांचा गर्भपात करणाऱ्या गोळ्यांवर बंदी घातली  होती.

राज्य सरकारने गर्भलिंगनिदान आणि असुरक्षित महिलांचा गर्भपात करणाऱ्या गोळ्यांवर बंदी घातली होती.

राज्य सरकारने गर्भलिंगनिदान आणि असुरक्षित महिलांचा गर्भपात करणाऱ्या गोळ्यांवर बंदी घातली होती.

भिवंडी, 14 डिसेंबर :  गर्भपात गोळ्यांची विक्रीस बंदी (abortion pills) असूनही राजरोसपणे भिवंडीमध्ये (Bhiwandi) मेडिकलमधून विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष, म्हणजे डॉक्टारांच्या परवानगी शिवाय राज्यात  गर्भलिंगनिदान व गर्भपात गोळ्यांच्या विक्रीस बंदी असूनही असा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यात डॉक्टर मुंडे यांच्या रुग्णालयात घडललेल्या शेकडो गर्भलिंगनिदान व गर्भपाताच्या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यामुळे राज्य सरकारने  गर्भलिंगनिदान आणि असुरक्षित महिलांचा गर्भपात करणाऱ्या गोळ्यांवर बंदी घातली  होती. पण अजूनही या गोळ्यांची औषध दुकानातून विक्री होत असल्याचे समोर आले आहे. या गोरखधंद्यामध्ये वैद्यकीय विभागासह पोलीस यंत्रणा व प्रशासनाचे कोणतेही धाक नसल्याने  गरजू ग्राहकांना  गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री होत असून  ह्या गर्भपाताच्या  गोळ्या 300 रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत विक्री केली जात होती. याबद्दल एका व्यक्तीने व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली. त्यामुळे बेकायदेशीर विक्री करणाऱ्या गोळ्यांवर कारवाई होणार का हे पाहण्याचे ठरणार आहे. भिवंडीत तीन वाहनं 30 फूट खोल खाईत कोसळली दरम्यान, मुंबई-नाशिक महामार्गावरील (Mumbai-Nashik highway) भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील पिंपळास फाट्याजवळ विचित्र अपघात (Road Accident) झाला आहे. एका पाठोपाठ तीन वाहनं 30 फूट खोल खाईत कोसळली आहेत. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मिळालेली माहिती अशी की, सध्या मुंबईसह परिसरात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. त्यात काही भागात बेमोसमी पाऊसही सुरू आहे. भिवंडीपासून जवळच असलेल्या पिंपळास फाट्याजवळ पावसामुळे रोड निसरडा झाल्यानं एका वाहन चालकानं अचानक वाहनाचा ब्रेक दाबला. त्यामुळे मागे असलेला भंगार भरलेला ट्रक थेट 30 फूट खोल खाईत कोसळला. त्यापाठोपाठ एचपी गॅसचा टँकर देखील त्याच खाईत कोसळला. नंतर एक कंटेनर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. एका तासाच्या अंतरानं असा तीन वेगवेगळ्या अपघाताच्या घटना घडल्या. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, अपघातामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
First published:

पुढील बातम्या