Home /News /crime /

‘तुम्ही मेला आहात’ असं सांगून घातला गंडा, लावला 3 लाखांचा चुना

‘तुम्ही मेला आहात’ असं सांगून घातला गंडा, लावला 3 लाखांचा चुना

ऑनलाईन चोरानं (Online Thief) एका नागरिकाला तो मेल्याचं (Dead) सांगून त्याला लाखो रुपयांचा गंडा (Fraud of lakhs) घातला.

    भोपाळ, 3 सप्टेंबर : आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud) पाहिले असतील किंवा वाचले असतील. मात्र नुकताच उघडकीला आलेला एक फ्रॉड पाहून पोलीसदेखील चक्रावून गेले आहेत. ऑनलाईन चोरानं (Online Thief) एका नागरिकाला तो मेल्याचं (Dead) सांगून त्याला लाखो रुपयांचा गंडा (Fraud of lakhs) घातला. जेव्हा ही बाब नागरिकाच्या लक्षात आली, तेव्हा फार उशीर झाला होता. असा झाला फ्रॉड मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये राहणारे अतुल कुमार जैन या नागरिकाने तीन विमा पॉलिसी काढल्या होत्या. छोटा व्यापार चालवणाऱ्या जैन यांना त्या पॉलिसी काही वैयक्तिक कारणासाठी बंद करायच्या होत्या. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन अर्ज केला आणि विमा लोकपालच्या वेबसाईटवर आपला अर्ज दाखल केला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना एक फोन आला. फोनवरील व्यक्तीनं आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातून बोलत असल्याचं सांगितलं. असे लुटले पैसे आपण आरबीआयचे अधिकारी असल्याचं सांगत विमा पॉलिसी रद्द करण्यासाठी प्रोसेसिंग फी भरावी लागेल, असं त्याने सांगितलं. प्रत्येक पॉलिसीपायी 4500 रुपयांची रक्कम भरण्याची सूचना त्याने केली. जैन यांनी ती सूचना मान्य केली आणि सांगितलेल्या खात्यावर तेवढे पैसे जमा केले. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा त्या व्यक्तीचा फोन आला. त्यावेळी त्याने सांगितलेली गोष्ट ऐकून जैन यांना जबर धक्का बसला. तुम्ही मेलेले आहात आणि तुमचे डेथ सर्टिफिकेट घेऊन दोन व्यक्ती आपल्याकडे विम्याचा दावा करण्यासाठी आल्या आहेत, असं त्याने जैन यांना सांगितलं. त्यावर आपण जिवंत असून आपली मदत करण्याचं आवाहन जैन यांनी फोनवरील व्यक्तीला केलं. हे वाचा - सिम अपडेट करण्यासाठी पुण्यातील महिलेला मोजावे लागले 11 लाख, वाचा नेमकं काय घडलं? ही मदत करण्यासाठी पुन्हा त्याने जैन यांच्याकडे पैसे मागायला सुरुवात केली. रोज काही ना काही कारण सांगून ती व्यक्ती जैन यांच्याकडून पैसे घेत असे. काही दिवसांनी मात्र ही व्यक्ती फसवत असल्याचा साक्षात्कार जैन यांना सांगितला आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र तोपर्यंत जैन यांच्या खात्यातून सुमारे 3 लाखांपेक्षा अधिक रुपये ऑनलाईन चोरट्याने लुटले होते. पोलिस या घटनेचा तपास करत असून हे पैसे दिल्लीतील एका खात्यात ट्रान्सफर झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याच्या तपासासाठी पोलिसांचं एक पथक दिल्लीला गेल्याचं सांगण्यात आलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Money fraud, Online fraud

    पुढील बातम्या