Home /News /crime /

ऑनलाइन सुरू होता देह व्यापार; पोलिसांची सापळा रचून तरुणींची केली सुटका

ऑनलाइन सुरू होता देह व्यापार; पोलिसांची सापळा रचून तरुणींची केली सुटका

लॉकडाऊनच्या काळापासून एका वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने देह व्यापाराचा व्यवसाय सुरू होता.

    नागपूर, 10 सप्टेंबर : ऑनलाईन पद्धतीने देह व्यापाराचा व्यवसाय चालविणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली असून परराज्यातील दोन युवतींची सुटका करण्यात पोलिसांना यश आलं आहे. लॉकडाऊनच्या काळापासून एका वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने  देह व्यापाराचा व्यवसाय सुरू होता. हा व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने सुरू असल्याने पोलिसांंनी त्यांचा शोध घेणं अवघड जात होते. मात्र अखेर पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आलं आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने यावर आपलं लक्ष केंद्रित केलं होतं. त्यांनी वेळोवेळी याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली. हे ही वाचा-ऑनलाइन गेममध्ये हरवलं म्हणून 11 वर्षीय मुलाने केली 10 वर्षांच्या मुलीची हत्या हा व्यवसाय नागपूरातील मनीष नगर भागात सुरू होता. आरोपी हातातून निसटू नये यासाठी पोलिसांनी सापळा रचना. त्यानंतर पूर्ण तयारीनिशी ते काम करीत असलेल्या भागात धाड टाकली. त्यानंतर व्यवसाय चालविणारे दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. परराज्यातील दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. अद्याप या व्यवसायाचा मुख्य सूत्रधार हाती लागलेला नाही. त्याचा शोध पोलिसांकडून केला जात आहे. हे ही वाचा-नोकरीचं आमिष दाखवून तरूणीवर सामुहिक बलात्कार, अमरावतीमधली संतापजनक घटना देशात अशा प्रकारे तरुणींची फसवणूक केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहे. लॉकडाऊनमध्ये क्राइमचं प्रमाण कमी झालं असलं तरी ऑनलाईन चोरी, सायबर क्राइम याचा पेव फुटलं आहे. त्यामुळे ऑनलाइन काम करताना वा कोणत्याही साइटवर सर्फिंग करताना योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Prostitution

    पुढील बातम्या