मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

महिलेला WhatsAppवरची एक छोटीशी चूक पडली महागात; चोरट्यांनी घातला लाखोंचा गंडा

महिलेला WhatsAppवरची एक छोटीशी चूक पडली महागात; चोरट्यांनी घातला लाखोंचा गंडा

 पैशाच्या हव्यासानं नागरिक सायबर गुन्हेगारांच्या (Cyber Criminals) सापळ्यात अडकतात

पैशाच्या हव्यासानं नागरिक सायबर गुन्हेगारांच्या (Cyber Criminals) सापळ्यात अडकतात

पैशाच्या हव्यासानं नागरिक सायबर गुन्हेगारांच्या (Cyber Criminals) सापळ्यात अडकतात

मुंबई, 28 ऑगस्ट: आजकाल ऑनलाइन फसवणुकीचे (Online Fraud) प्रमाण वाढलं आहे. याबाबत पोलिस, बँका आणि सरकार अशा सर्वांकडूनच वारंवार सावधगिरीचा इशारा दिला जात असतो. जागरूकता निर्माण करणाऱ्या सूचना प्रसिद्ध केल्या जात असल्या, तरीही पैशाच्या हव्यासानं नागरिक सायबर गुन्हेगारांच्या (Cyber Criminals) सापळ्यात अडकतात आणि आपलं नुकसान करून घेतात.

आजकाल बनावट लिंक (Fraud Links), ई-मेल्स (Emails) पाठवून बँक खातं हॅक करून पैसे काढून घेण्याचे गुन्हे वाढले आहेत. अशाच प्रकारच्या एका ऑनलाइन फसवणुकीची एक घटना नुकतीच चारकोप (Charkop) इथं उघडकीस आली आहे. 27 वर्षांच्या एका महिलेनं आपली 3 लाखांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाल्याची तक्रार चारकोप पोलीस ठाण्यात (Charkop Police Station) नोंदवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंटीरियर डिझायनर (Interior Designer) असलेल्या या महिलेला व्हॉट्सअॅपवर (What’s app) एका आघाडीच्या ऑनलाइन शॉपिंग पोर्टलच्या (online Shopping Portal) नावाने एक लिंक (Link) मिळाली. त्यासोबत बक्षीस देण्याची हमी देण्यात आली होती. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर या महिलेला एक युझर आयडी आणि पासवर्ड बनवण्यास सांगण्यात आलं. ते केल्यानंतर तिला 64 रुपये बक्षीस देण्यात आले. त्यानंतर तिला आणखी एक रिचार्ज (Recharge) करण्यास सांगितलं गेलं. ते केल्यावर पुन्हा तिला बक्षीस देण्यात आलं.

हे वाचा - भयंकर! 15 वर्षांची मुलगी 14 वर्षांच्या प्रियकरापासून गर्भवती; बातमी कळताच प्रियकरानं उचललं धक्कादायक पाऊल

अशा प्रकारे काही वेळा बक्षीस देण्यात आल्यानंतर आणखी मोठं बक्षीस मिळवण्यासाठी या महिलेला काही रक्कम जमा करण्यास सांगण्यात आलं. त्यानुसार तिने 3 लाख 11 हजार रुपये जमा केले; पण त्या बदल्यात तिला काहीच पैसे मिळाले नाहीत. त्या वेळी आपली फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं आणि तिने चारकोप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 420 अंतर्गत फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींनुसार एफआयआर (FIR) नोंदवली असून, तपास सुरू केला आहे.

सध्याच्या काळात ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. बहुतांश वेळा मोबाइलवर, व्हॉट्सअॅपवर अनोळखी व्यक्तीकडून एखादी लिंक पाठवली जाते आणि त्यावर क्लिक केल्यास बक्षीस मिळण्याची लालूच दाखवली जाते. सायबर गुन्हेगारांद्वारे अशा लिंक पाठवल्या जातात. काही वेळा त्यावर क्लिक केल्यानंतर बक्षिसाची रक्कम दिलीही जाते. त्यामुळे लोकांचा विश्वास बसतो आणि ते त्या व्यक्तीकडून येणाऱ्या सूचनांनुसार क्रिया करतात. नंतर आपल्या बँक खात्यातून मोठी रक्कम गेल्याचं लक्षात येतं; पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. त्यामुळे लोकांनी कोणत्याही विनामूल्य बक्षिसाचं किंवा पैसे मिळण्याचं आमिष दाखवणाऱ्या मेसेजेसवर विश्वास ठेवू नये. व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा कोणत्याही सोशल मीडियावरील अशा लिंक्सवर क्लिक करू नये, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

First published:

Tags: Money fraud, Mumbai, Online fraud