नवी दिल्ली, 23 डिसेंबर: केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) अधिकाऱ्यांनी मंगळवारी श्रीनगरमधून एका 35 वर्षांच्या काश्मिरी तरुणाला अटक केली आहे. हा तरुण अमेरिकेत राहणाऱ्या त्याच्या बायकोच्या मदतीने अमेरिकेतील अल्पवयीन मुलांचे पॉर्न व्हिडिओ आणि फोटो (Child Sextual Abuse Material- CSAM) तयार करून इंटरनेटवर शेअर करत होता. प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) कायदा कलम 14 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 ब (मुलांशी संबंधित अश्लील माहिती इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिद्ध करणं किंवा दुसरीकडे पाठवणं) अंतर्गत हा गुन्हा दाखल केल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार हा तरुण मूळचा काश्मीरमधील श्रीनगरचा असून तो अमेरिकी नागरिक आणि वॉशिंग्टनमध्ये राहत असलेल्या आपल्या बायकोच्या मदतीने अमेरिकेतील मुलांचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो तयार करून घेत होता. या दोघांचं नातं 'मालक-गुलाम' (master-slave relation) अशा पद्धतीचं होत. तो ज्याप्रमाणे सांगायचा त्याप्रमाणे ती अमेरिकी मुलांचं शोषण करत असे. त्याची पत्नी हे लहान मुलांचे व्हिडीओ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवत असे. सीबीआय प्रवक्ते आरके गौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पैसे कमवण्यासाठी हा तरुण हे अश्लील व्हिडिओ डार्क वेबवर (Dark Web) टाकायचा आणि अमेरिकेतील अनेक लहान मुलांशी तो संपर्कात होता.'
(हे वाचा-महिलांना अश्लिल कॉल करणाऱ्या विकृताला अटक, बँकेत होता मोठ्या पदावर!)
सीबीआयच्या माहितीनुसार त्याच्यावर असा आरोप आहे की, जी मुलं त्याच्या धमक्यांनुसार वागत नसत त्यांचे फोटो-व्हिडीओ तो त्यांच्या कुटुंबीयांशी शेअर करत असे. त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.सीबीआयच्या विशेष तपास पथकाने त्या तरुणाच्या घराचा तपास केल्यानंतर त्यांना तिथे 3 लॅपटॉप, 5 मोबाइल फोन, पेन ड्राइव्ह आणि काही लिखीत स्वरुपातील नोट्स सापडल्या आहेत.
(हे वाचा-सिस्टर हत्या प्रकरणात चर्चचे पाद्री आणि नन यांना जन्मठेप)
‘सायबर स्पेसमध्ये अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचारांसंदर्भात सीबीआय आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अमेरिकेतील पोलिसांशी कायम संपर्कात आहेत. परस्परांच्या मदतीने कारवाईही केली जाते,’ अशी माहिती यावेळी गौर यांनी दिली. दरम्यान, सीबीआयने 16 नोव्हेंबरला उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातील एका ज्युनिअर इंजिनीअरला ताब्यात घेतलं होतं. तो चित्रकूट, बांदा आणि हमीरपूर या तीन जिल्ह्यांतील 50 मुलांचं लैंगिक शोषण करत होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Cyber crime