हैदराबाद, 30 ऑक्टोबर : तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील मे महिन्यात 9 जणांची हत्या केल्याच्या आरोपाखाली बिहारमधील एका तरुणाला बुधवारी कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. गुन्हेगार संजय कुमार यादव याने सांगितलं की, एक हत्या लपविण्यासाठी 9 हत्या केल्या. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संजय यादव आणि मोहम्मद मकसूद हे आवम वारंगल येथील एका गावातील फॅक्टरीमध्ये काम करीत होते. बंगालचे निवासी मकसूद यांच्यासह त्यांचं कुटुंबीयही राहत होतं. काही दिवसांपूर्वी मकसूद यांची घटस्फोटीत भाजी रफीकाही सोबत राहायला आली. संजयची रफीकावर वाईट नजर होती.
काही दिवस सर्व ठीक सुरू होतं. मात्र एकेदिवशी संजयने रफीकावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रफीकाने गोंधळ घातला. त्यानंतर कसंबसं हे प्रकरण सोडवलं व रफीकासोबत लग्न करण्यासाठी तिच्या कुटुंबीयांशी बोलायला सांगितलं. रफीकाच्या घरी जाण्यासाठी दोघांनी 6 मार्च रोजी गरीब रथ ट्रेन पकडली. रस्त्यात संजयने रफिकाला खाण्यात विष दिलं व गळा दाबून तिची हत्या केली.
हे ही वाचा-मुंबईत ड्रग्स माफियांचा सुळसुळाट, 2 वेगवेगळ्या घटनेत 50 लाखांचे ड्रग्स जप्त
आंध्रप्रदेशाच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यात निदादवोले स्टेशनजवळ त्याने रफीकाचा मृतदेह फेकून दिला. यानंतर तो राजमुंदरी स्टेशनवर उतरुन दुसऱ्या ट्रेनने परतला. परतल्यानंतर मकसूदने जेव्हा रफीकाबद्दल विचारलं तेव्हा संजय म्हणाला की, ती आपल्या घरी पोहोचली. मकसूदचं कुटुंबीय बरेच दिवस रफीकाबद्दल विचारत होते. मात्र त्यानंतर कुटुंबाने पोलिसांकडे जाण्याची धमकी दिली. यावर संजय घाबरला आणि आपला गुन्हा लपवण्यासाठी संपूर्ण कुटुंबाची हत्या करण्याचा कट रचू लागला.
20 मे रोजी मकसूद आपला मुलगा शाहबाज याचा वाढदिवस साजरा करीत होता. त्या दिवशी संजयने खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये झोपेच्या गोळ्या घातल्या व बेशुद्धावस्तेत त्याच्या घरी घेऊन गेला. हा सर्व प्रकार त्रिपुराहून आलेल्या एका नातेवाईकाने पाहिला.
हे ही वाचा-धक्कादायक! ICU मध्ये व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देणाऱ्या तरुणीवर बलात्कार
यावेळी सर्वजण बेशुद्धावस्थेत होते. यानंतर संजयने रात्रीतून सर्वांना एक एक करीत गोणीत घालून विहिरीत फेकून दिलं. मृतांमध्ये मकसूद, त्याची पत्नी निशा, दोन मुलं एक शाहबाज आलम आणि सोहेल आलम, मुलगी बुशरा, बुशराचा तीन वर्षां मुलगा आणि नातेवाईक शकील यांचा सहभाग होता. यानंतर तो इमारतीत राहणाऱ्या दोन बिहार तरुण श्रीराम कुमार शाह आणि श्याम कुमार शाह यांच्याजवळ गेला आणि त्यांनाही झोपेच्या गोळ्या देऊन बेशुद्ध केलं. आणि त्यांचीही हत्या केली. या दोघांचा दोष इतकाच होता की या दोघांनी मकसूदच्या घरात सुरू असलेला कार्यक्रमात संजयला पाहिलं होतं. संजय हा बिहारमधील बेगूसराय जिल्ह्यातील नुरपूर गावातील राहाणारा असल्याचे सांगितले जात आहे.