माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा खेळ खल्लास; एकतर्फी प्रेमातून युवकाची शरीरसुखाची मागणी

माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा खेळ खल्लास; एकतर्फी प्रेमातून युवकाची शरीरसुखाची मागणी

पुण्यात एका तरुणानं एकतर्फी प्रेमातून (one sided love) एका युवतीकडे शरीरसुखाची (Demand sexual intercourse) मागणी केली आहे. आरोपी युवकाला मार्केट यार्ड पोलिसांनी अटक केली आहे.

  • Share this:

पुणे, 10 मे: पुण्यात एका युवकानं एकतर्फी प्रेमातून (one sided love) एका युवतीकडे शरीरसुखाची (Demand sexual intercourse) मागणी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी युवकानं पीडित युवतीकडे माझ्याशीच लग्न (Demand for marriage) कर असा तगादा लावला होता. तसेच त्यानं माझ्याशी लग्न नाही केलं, तर तुझ्या आई वडिलांना जीवे (Threat to death) मारेल, अशी धमकीही दिली आहे. याप्रकरणी पीडितेनं मार्केट यार्ड पोलिसांत गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपी युवकाला अटक (Accused arrest) केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मार्केट यार्ड पोलिसांकडून केला जात आहे.

संबंधित 23 वर्षीय आरोपी युवकाचं नाव कुतुबुद्दीन हबीब काचवाला असून तो कसबा पेठेत राहातो. आरोपी काचवाला आणि पीडित तरुणी 2016 साली एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतं होते. आरोपी युवक हा तेव्हापासून पीडितेवर एकतर्फी प्रेम करत होता. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच पीडितेनं आरोपीसोबत रेलेशन ठेवण्यास नकार दिला होता. पण तरीही आरोपी तरुणानं तिचा पिच्छा सोडला नाही.

तू जर दुसऱ्या कोणाशी लग्न केलं, तर त्या मुलाला आणि तुझ्या आई वडिलांना जीवे मारेन अशी धमकीही त्यानं दिली आहे. एवढंच नव्हे तर त्यानं पीडित युवतीकडून एक सोन्याची साखळी आणि  40 हजार रुपयांची रोकड अशी एकूण 85 हजार रुपयांची खंडणी देखील उकळली आहे. त्यामुळे आरोपी युवकाच्या सततच्या त्रासाला कंटाळून 21 वर्षीय पीडित युवतीनं मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हे ही वाचा-मुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

संबंधित आरोपीनं आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देवून शरीरसुखाची मागणी केल्याचंही पीडितेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी युवक  कुतुबुद्दीन हबीब काचवालाला राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास मार्केट यार्ड पोलीस करत आहेत.

Published by: News18 Desk
First published: May 10, 2021, 11:13 AM IST

ताज्या बातम्या