• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • लग्नात चिकनसोबत लिट्टी न मिळाल्यानं पेटला वाद, गोळीबारात एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

लग्नात चिकनसोबत लिट्टी न मिळाल्यानं पेटला वाद, गोळीबारात एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

वरातीत चिकनसोबत (Chicken) खाण्यासाठी लिट्टी न मिळाल्यानं वाद झाला. यातून झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू (One Killed in Firing) झाला आहे. तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

 • Share this:
  पाटणा 09 मे: एका लग्न समारंभातील (Marriage Program) अजब प्रकार समोर आला आहे. वरातीत चिकनसोबत (Chicken) खाण्यासाठी लिट्टी न मिळाल्यानं वाद झाला. यातून झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू (One Killed in Firing) झाला आहे. तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. राजेंद्र सिंह असं मृताचं नाव आहे. तर, राहुल कुमार सिंह, रिशु कुमार सिंह आणि रोहित कुमार सिंह अशी या घटनेत जखमी झालेल्यांची नावं आहेत. ही घटना बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील उचकागांव ठाण्याच्या क्षेत्रातील नरकटिया गावातील आहे. जखमींना सुरुवातील गोपालगंजमधील रुग्णालयातील आपात्कालीन वार्डात दाखल कऱण्यात आलं. पुढे डॉक्टरांनी चांगल्या उपचारासाठी त्यांना गोरखपूरमधील रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितलं. यानंतर कुटुंबीय तिघांना उपचारासाठी गोरखपूरला घेऊन गेले. मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र सिंहच्या घराशेजारी एक वरात आली होती. वरातीत चिकनसोबत लिट्टी न मिळाल्यामुळे वाद सुरू झाला. यातूनच पुढे गोळीबार सुरू झाला. यात राजेंद्र सिंह यांच्यासह चार जणांना गोळी लागली. उपचारासाठी चौघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी राजेंद्र सिंग यांना मृत घोषित केलं. तर, इतर तिघे गंभीर जखमी आहेत. डॉक्टरांनी तिघांनाही एक्स रे करण्यासाठी पाठवलं असता समजलं की एक्स रे कक्ष बंद आहे. यानंतर कुटुंबातील सदस्यांनी आणि इतरांनी एक्स रे बंद असल्यानं गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुटुंबातील सदस्यांचं असं म्हणणं होतं, की रुग्णालयाच्या आपात्कालीन वार्डातही सुविधा नसून एक्स रे कक्षही बंद आहे. यानंतर तिन्ही रुग्णांना चांगल्या उपचारासाठी गोरखपूरमध्ये घेऊन जाण्यात आलं आहे. पोलिसांनी सांगितलं, की गोळीबार झाल्याची मिळताच पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. गोळीबार करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वरातती चिकनसोबत लिट्टी न मिळाल्यानं हा वाद सुरू झाला होता. गोळीबारानंतर गावात एकच गोंधळ उडाला होता.
  Published by:Kiran Pharate
  First published: