• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • भरधाव कारनं फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडलं; थरारक घटनेचा LIVE VIDEO आला समोर

भरधाव कारनं फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडलं; थरारक घटनेचा LIVE VIDEO आला समोर

एका भरधाव कारनं फुटपाथवरील पाच कामगारांना चिरडल्याची (Car Ran Over Five Pavement Dwellers) धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे

 • Share this:
  अहमदाबाद 29 जून: एका भरधाव कारनं फुटपाथवर झोपलेल्या पाच कामगारांना चिरडल्याची (Car Ran Over Five Pavement Dwellers) धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला (One Woman Was Killed) आहे तर चौघं गंभीर जखमी आहे. या थरारक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज (Gujarat Accident CCTV Footage) समोर आलं आहे. या कारने एका दुचाकीलाही धडक दिल्याचं यात पाहायला मिळतं. Petrol-Diesel Price Today: इंधनाचा भडका सुरूच! मुंबईत पेट्रोलचे दर 105 रुपयांवर कार चालकाचा शोध अद्याप लागलेला नसून पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. कार चालकासोबतच गाडीतील इतर लोकही फरार झाले आहेत. सोमवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली असल्याचं म्हटलं जात आहे. मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर बसण्यावरून हमरीतुमरी; मारहाणीत शिक्षकाचे पाडले दात दरम्यान मागील आठवड्यात हैदराबादमधील शहालीबांडा येथीही अशीच एक घटना घडली होती. या घटनेत मर्सिडीजच्या मालकाने पादचारी एका ऑटोला धडक दिली होती. यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेतही चार जण जखमी झाले होते. मात्र, दुसऱ्याच दिवसी हैदराबाद पोलिसांनी घटनास्थळावरुन फरार झालेल्या आरोपीची ओळख पटवली होती. पोलिसांनी कारच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यातही घेतलं होतं, मात्र पुढे या केससंदर्भाच काही अपडेट मिळाले नव्हते. या व्यक्तीनं नुकतीच मर्सिडीज खरेदी केली होती. यानंतर आपल्या मित्रांसोबत 23 जून रोजी तो नव्या कारनं बाहेर फिरण्यासाठी निघाला होता. मात्र, गाडीवर ताबा सुटल्यानं हा अपघात घडला होता.
  Published by:Kiran Pharate
  First published: