• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • दिवसाढवळ्या भर रस्त्यात गोळीबार, पुन्हा सक्रीय होतायत टोळ्या

दिवसाढवळ्या भर रस्त्यात गोळीबार, पुन्हा सक्रीय होतायत टोळ्या

गाडीतून चाललेल्या व्यक्तीवर अचानक तीन ते चार जणांनी गोळीबार केल्याची (One injured in firing by goons) घटना नुकतीच समोर आली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : गाडीतून चाललेल्या व्यक्तीवर अचानक तीन ते चार जणांनी गोळीबार केल्याची (One injured in firing by goons) घटना नुकतीच समोर आली आहे. राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून गुंडगिरीत वाढ (rising criminal incidences in Delhi) होत असल्याचं चित्र असून दिवसाढवळ्या भर रस्त्यावर गोळ्यांचे आवाज ऐकू येत असल्याचं नागरिक सांगत आहेत. असा झाला गोळीबार जामीनावर बाहेर आलेल्या एका हत्येच्या आरोपीच्या ड्रायव्हरवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना दिल्लीत घडली आहे. हा ड्रायव्हर त्याच्या कारमधून चालेलला असताना अचानक त्याला थांबवण्यात आलं आणि गोळीबार करण्यात आला. लकी नावाचा ड्रायव्हर या घटनेत जखमी झाला असून त्याला दिल्लीच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीत दहशत दिवसाढवळ्या शहरात गोळीबार झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैयक्तिक वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आला आहे. हत्येच्या आरोपात शिक्षा भोगणारा आरोपी धामी पैलवान सध्या जामीनावर बाहेर आला आहे. त्याचा ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या लकीवर गोळीबार करण्यात आला आहे. धामी पैलवानला इशारा देण्यासाठीच हा गोळीबार करण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. भविष्यातील मोठ्या टोळीयुद्धाची ही नांदी असून दिल्लीतील गुंडाराज पुन्हा वाढू लागल्याचं निरीक्षण या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. हे वाचा- डॉक्टर तरुणीने केली आत्महत्या; कागदावर 200 वेळा लिहिलं 'आशिष LOVE वैशाली' दिल्लीत वाढतोय हिंसाचार काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील रोहिणी कोर्टात हिंसाचाराची घटना घडली होती. दिवसाढवळ्या या इमारतीत गुंड घुसले आणि तिथं आलेल्या तिघांची त्यांनी हत्या केली होती. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून गुंड सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी अंदाधुंद फायरिंग करत असल्यामुळं गँगवॉरसारखी परिस्थिती निर्माण होत असल्याचं चित्र आहे. पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत गुंडांना आवर घालावा, अशी मागणी सर्वसामान्य करत आहेत.
  Published by:desk news
  First published: