विजय वंजारा, प्रतिनिधी
मुंबई, 15 मार्च : चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीत टोळक्याने एका व्यक्तीला जबर मारहाण केली होती. या घटनेत पीडित तरुण गंभीर जखमी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज त्याची प्राणज्योत मालवली आहे. ही घटना 7 मार्चला घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
काय आहे प्रकरण?
चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 मार्च रोजी 4 जणांनी मिळून एका व्यक्तीला शस्त्रांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे ती व्यक्ती गंभीर जखमी झाली. जखमी व्यक्ती मनीष उर्फ (विराज) यादव (28) याला जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे जखमी व्यक्तीवर उपचार सुरू होते. या भांडणप्रकरणी चारकोप पोलिसांनी खुनाचा प्रयत्न (307) गुन्हा दाखल करून 3 जणांना अटक केली. ज्यामध्ये एक आरोपी फरार आहे. तपासादरम्यान चारकोप पोलिसांना आढळून आले की आरोपी आकाश प्रकाश जाधव (24), राहुल बाबू मनोहर (23) आणि राजू चंद्रकांत बागुल (25) यांच्यावर मारहाणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी कांदिवली पश्चिम येथील लक्ष्मी नगर चारकोप गावातील रहिवासी आहेत.
वाचा - क्रुरतेचा कळस! डॉक्टरने थेट ड्रायव्हरचे करवतीने 70 तुकडे केले, कारणही भयानक
एवढेच नाही तर मारहाण झालेल्या मनीष उर्फ (विराज) यादव (28) याच्यावर घरफोडी, चोरी, दरोड्याचे 12 गुन्हे दाखल आहेत. मनीष उर्फ (विराज) यादव (28) या जखमी व्यक्तीचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. चारकोप पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
लालबाग परिसरात घरात आढळला मृतदेह
मुंबईतील लालबाग परिसरात खुनाची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंबई पोलिसांना लालबाग येथील पेरू कंपाऊंड परिसरात एका 53 वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत आढळला. महिलेचा मृतदेह प्रथम प्लास्टिकच्या पिशवीत भरून नंतर कपाटात बंद करून ठेवण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी महिलेच्या मुलीला संशयाच्या आधारे ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू आहे. महिलेच्या हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Mumbai police