Home /News /crime /

मधुचंद्राच्या रात्री नवरीने सांगितलं स्वत:च गुपित; संतापलेल्या नवरदेवाचा घटस्फोटासाठी अर्ज

मधुचंद्राच्या रात्री नवरीने सांगितलं स्वत:च गुपित; संतापलेल्या नवरदेवाचा घटस्फोटासाठी अर्ज

एकमेकांसोबत प्रामाणिक राहणार, काहीच लपवणार नाही, असं ठरवत त्यांची नवा संसार सुरू करण्याच्या रात्री एकमेकांना वचन दिलं होतं आणि याची सुरुवात पत्नीपासून झाली.

    मध्य प्रदेश, 15 ऑक्टोबर : ग्वाल्हेरमध्ये मधुचंद्राच्या रात्री पती-पत्नीमधील (Husband and Wife) नात्याला एक मोठा धक्का बसला. एकमेकांसोबत प्रामाणिक राहणार, काहीच लपवणार नाही, असं ठरवत त्यांची नवा संसार सुरू करण्याच्या रात्री एकमेकांना वचन दिलं होतं आणि याची सुरुवात पत्नीपासून झाली. पत्नीने रडत रडत मधुचंद्राच्या रात्री एक धक्कादायक खुलासा (shocking revelation on the night of the honeymoon) केला. जो ऐकून पतीला जबर धक्काच बसला. पत्नीने सांगितलं की, तिच्यावर तिच्या मामाच्या मुलाने बलात्कार केला होता. यावर पतीला धक्काच बसला. लग्नाच्या आधीच हे का सांगितलं नाही असा सवाल पतीने केला. दुसऱ्या दिवशी पतीने ही सर्व बाब संपूर्ण कुटुंबीयांना सांगितली आणि लग्नाच्या 25 दिवसांनंतर फॅमिली कोर्टात घटस्फोट दाखल केला. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. पतीने कोर्टात सांगितलं की, पत्नीवर बलात्कार झाल्याचं वृत्त तिच्यापासून लपवण्यात आलं होतं. हे चुकीचं होतं. या प्रकरणात गुरुवारी महिला पक्षाकडून कोणीही उपस्थित नव्हतं. कोर्टाने सुनावणी पूर्ण केल्यानंतर निर्णय सुरक्षित ठेवला आहे. ग्वाल्हेर निवासी 25 वर्षांचा तरुण एका खासगी कंपनीत काम करतो. डिसेंबर 2019 मध्ये कुटुंबाने मोठ्या थाटामाटात त्याचं लग्न लावलं होतं. 22 वर्षांची नवरी मोठ्या आनंदात पोहोचली. मधुचंद्राच्या दिवशी नवरदेवाला कळालं की, पत्नीवर यापूर्वीच बलात्कार झाला आहे. हे स्वत: पत्नीनेच आपल्या पतीला सांगितलं. पत्नीवर बलात्कार झाल्याचं वृत्त कळताच पतीला धक्का बसला. तो खूप संतापला. त्याने आपल्या कुटुंबीयांना सर्व हकिकत सांगितली. त्याने दुसऱ्याच दिवशी फॅमिलो कोर्टात केस दाखल केली. कोरोनामुळे बराच काळ कोर्ट बंद होते. तरुणाने घटस्फोट घेण्यामागील कारण पत्नीवरील बलात्कार नाही तर लग्नापूर्वी ही बाब लपवून ठेवून त्याची फसवणूक केल्याचं सांगितलं. हे ही वाचा-Tinderवरील मित्रानं केला विश्वासघात; पुण्यातील IT अभियंता तरुणीला 73लाखांचा गंडा मामाच्या मुलाने केला होता बलात्कार.. या प्रकरणाबाबत तरुणीने आपल्या पतीला सांगितलं होतं की, तिच्या मामाच्या मुलाने तिच्यावर बलात्कार केला होता. यानंतर पतीने पत्नीच्या कुटुंबीयांना फोन करून इतकी मोठी गोष्ट लपविल्यानागील कारण विचारल. यादरम्यान नवरी सतत रडत होती, मात्र तरुणाला तिची दया आली नाही. ही बाब लपवून त्याची फसवणूक केल्याचं तरुणाला वाटत आहे. या प्रकरणात कोर्टात केसदरम्यान महिलेकडून कोणीच आलं नाही. कोर्टाने एका पक्षीय सुनावणी केल्यानंतर निर्णय सुरक्षित ठेवला आहे. कायद्यानुसार काय आहे तरतूद..? ग्वाल्हेर हायकोर्टाचे वकील अंकिश वशिष्ठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कायदेशीरपणे व्यभिचार, हिंसा, महिलेचं संन्यासी होणं, सात वर्षांपेक्षा अधिक बेपत्ता असणं या आधारावर पुरुषांना घटस्फोट मिळू शकतो. मात्र लग्नापूर्वी बलात्कार झाल्याच्या कारणावरुन त्याला घटस्फोट मिळू शकत नाही. असं झालं तर बलात्कार पीडितेचं लग्नचं होऊ शकणार नाही.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Divorce, Madhya pradesh, Marriage

    पुढील बातम्या