Home /News /crime /

वाढदिवशी तरुणाची आत्महत्या; पार्टीवरुन घरी आला आणि घेतला गळफास!

वाढदिवशी तरुणाची आत्महत्या; पार्टीवरुन घरी आला आणि घेतला गळफास!

पहाटे थंडी वाजत होती म्हणून पत्नी खोलीत गेली, पाहते तर...

    पाटना, 18 डिसेंबर : भागलपूरमध्ये (Bihar News) शनिवारी सकाळी एका तरुणाचा मृतदहे खोलीत लटकलेल्या अवस्थेत सापडला. ही घटना तातरपुर पोलीस ठाणे हद्दीत घडली. मृत व्यक्तीच्या पत्नीने सांगितलं की, पतीने आपल्या वाढदिवशी एका छोट्याशा कारणावरुन गळफास घेऊन आत्महत्या (Suicide Case) केली. तरुणाचं नाव शैलेंद्र कुमार असल्याचं समोर आलं आहे. शैलेंद्रच्या पत्नीवर हत्येचा आरोप करण्यात आला आहे. मृत व्यक्तीच्या भावाने हा आरोप लावला आहे. वाढदिवसाच्या पार्टीवरुन परतल्यानंतर पत्नीसोबत झाला वाद.. पत्नी नेहा निगम हिने पोलिसांना सांगितलं की, शैलेंद्र रात्री उशिरा मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी करून परतले होते. जेवणाबद्दल विचारलं असता ते नाही म्हणाले. यावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि ते आपल्या खोलीत निघून गेले. मी दोन्ही मुलींसोबत डायनिंग हॉलमध्येच झोपले. सकाळी थंडी वाजायला लागली म्हणून मी बेडरूममध्ये गेले तर शैलेंद्र गळफास घेऊन घटकलेल्या अवस्थेत होते. नेहाने याबाबत शैंलेंद्रच्या कुटुंबीयांना माहिती दिली. यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळतात रुग्णालयात पोहोचले मृताचे भाऊ यांनी ही हत्या असल्याचं सांगून त्याची पत्नी आणि कुटुंबीयांवर हत्येचा आरोप लावला. हे ही वाचा-2 महिन्यातच घटस्फोट; मग राहिली लिव्ह इनमध्ये, महिलेचं प्रियकरासोबत विकृत कृत्य कुटुंबीयांसोबत पत्नीने पतीची केली हत्या... शैलेंद्रचा मोठा भाऊ विजय रजक याने आरोप लावला आहे की, भावाच्या पत्नीचे जवळच राहणाऱ्या तरुणासोबत अवैध संबंध होते. संपत्ती हडपण्यासाठी तिने भावाची हत्या करून आत्महत्येचं स्वरुप दिलं. तर नेहाच्या वडिलांनी सांगितलं की, जावयाने दारूच्या नशेत आत्महत्या केली. आता पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत..

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Suicide

    पुढील बातम्या