मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /IT रेडमध्ये 340 कोटींचा काळा पैसा; चौथ्या दिवशी 10 कोटी सोन्याचे दागिने आणि 1 कोटी कॅश जप्त

IT रेडमध्ये 340 कोटींचा काळा पैसा; चौथ्या दिवशी 10 कोटी सोन्याचे दागिने आणि 1 कोटी कॅश जप्त

काळा पैशांचा आकडा अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काळा पैशांचा आकडा अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काळा पैशांचा आकडा अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली, 25 डिसेंबर : आयकर विभागाने दोन व्यावसायिक समूहांवरील कारवाई पूर्ण केली आहे. विभागाने दोन्ही समुहाच्या 51 ठिकाणांपैकी 49 जागांवर कारवाई केली आहे. आतापर्यंतच्या कारवाईत विभागातील साधारण 340 कोटींची काळा पैशांसंबंधित (black money) कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत.

काळा पैशांचा आकडा अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत 20 किलो सोन्याचे दागिने जप्त केले असून याची किंमत साधारण 10 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. तर 1 कोटींची कॅशदेखील अधिकाऱ्यांच्या हातील लागली आहे. (OMG 340 crore black money found in IT raid on fourth day 20 kg gold jewelery of 10 crore and 1 crore hair seized)

आयकर विभागाने बुधवारपासून ही कारवाई सुरू केली असून 2 व्यावसायिक समूहांच्या ठिकाणांवर छापेमारी केली. विभागाच्या इन्वेस्टिगेश ब्रान्चच्या 50 हून अधिक टीमने राजस्थान, मुंबई आणि उत्तराखंडमधील 51 ठिकाणी छापेमारी केली आणि कारवाई सुरू केली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यावसायिक समुह विटो इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅन्ड, हॉटेल आणि रियल इस्टेटशी संबंधित आहे. याचे जयपूरमध्ये 25, मुंबईत 8 आणि हरिद्वारमध्ये एकेठिकाणी कारवाई सुरू केली होती. जयपूरमध्ये याचे 2 हॉटेल, आदर्श नगर आणि नेहरू बाजारमध्ये व्यापारिक प्रतिष्ठान, मालवीय संस्थेच्या भागात एक इमारतीचा समावेश आहे. दुसरा समूह मनी लॉन्ड्रिंगमध्ये काम करतो, याच्या जयपूरमधील 17 ठिकाणी कारवाई केली.

हे ही वाचा-3 लग्नानंतरही मेव्हणीसोबत अवैध संबंध;हनिमूनच्या रात्री केलेल्या कॉलमुळे झाला End

डिजिटल कागदपत्रंही सापडले...

हॉटेल आणि रियल इस्टेट व्यावसायिकांशी संबंधित ठिकाणांवर काही पेन ड्राइव्ह सापडले आहेत. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा संशयास्पद व्यवहार दिसून येत आहे. सध्या या प्रकरणात तपास सुरू आहे. याच प्रमाणे मनी लॉन्ड्रिंगचं काम करणाऱ्या समुहाच्या ठिकाणांवर कोट्यवधी रुपयांच्या संपतीचे कायदपत्र सापडले आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हा समूह लोकांना कर्ज देण्यासाठी त्यांच्या संपत्तीचे कागदपत्रं स्वत:जवळ ठेवून घेत होता. आयकर विभाग याचाही तपास करीत आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Income tax