नवी दिल्ली, 22 मे: हत्या प्रकरणात फरार असलेल्या ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारला (Sushil Kumar) अखेर अटक करण्यात आली आहे. स्पेशल सेलने सुशील कुमारला अटक केली आहे. स्पेशल सीपी नीरज कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Wrestler Sushil Kumar has been arrested by a team of Special Cell, says Neeraj Thakur, Special CP-Special Cell pic.twitter.com/cIbyulgsbk
— ANI (@ANI) May 23, 2021
काय आहे प्रकरण?
ज्युनिअर नॅशनल चॅम्पीयनशीप स्पर्धा विजेत्या कुस्तीपटूच्या हत्या प्रकरणात कुस्तीपटू सुशील कुमार आरोपी आहे. या प्रकरणात पोलिसांनी सुशीलसह आणखी दोन कुस्तीपटूंच्या घरावर धाड टाकली होती. दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये कुस्तीपटूंच्या दोन गटामध्ये मारामारी झाली. यामध्ये 23 वर्षांच्या एका कुस्तीपटूचा मृत्यू झाला.
सुशील कुमार याच्या विरोधातही या प्रकरणामध्ये आरोप आहेत. "सुशीलवर आरोप असल्यानं आमची टीम त्याच्या घरी गेली होती. पण तिथे नव्हता. या प्रकरणातल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या टीम तयार केल्या आहेत,'' असं उत्तर पश्चिम दिल्लीचे अतिरिक्त डीसीपी डॉ. गुरिकबल सिंह यांनी सांगितले. सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांचा या गुन्ह्यात सहभाग आहे, अशी माहिती प्राथमिक तपासात पुढं आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
या मारामारीत एकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. मृत कुस्ताीपटूचे नाव सागर कुमार असून सोनू महल (वय, 35) आणि अमित कुमार (वय 27) हे दोघं जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी प्राथमिक तक्रार दाखल केली असून प्रिन्स दलाल (वय 24) या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन एक बंदूक देखील जप्त केली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये सुशील कुमार, अजय, प्रिन्स, सोनू, सागर, अमित आणि अन्य कुस्तीपटूंमध्ये मारामारी झाली. सागर आणि त्याचे मित्र स्टेडियम जवळच्या टाऊन हॉलमधील एका घरात राहत होते. त्यांना नुकतंच हे घर रिकामं करण्याची सूचना देण्यात आली होती.
"सागर यापूर्वी 97 किलो वजनी गटातील ग्रीक-रोमन स्पर्धेत सहभागी झाला होता. तसंच तो माजी ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियम आणि वरिष्ठ राष्ट्रीय शिबिराचा सदस्य होता. तर सोनू महल हा गँगस्टर काला जत्थेदीच्या जवळचा आहे. यापूर्वी देखील त्याला चोरी आणि हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती," अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Murder, Shocking, Shocking news