लोणावळ्यात चोरीच्या उद्देशाने घरात घुसून वृद्ध महिलेचा खून

लोणावळ्यात चोरीच्या उद्देशाने घरात घुसून वृद्ध महिलेचा खून

घराची पाहणी केली असता घरातील साहित्य इतरत्र पसरलेले आढळून आले. तसंच मौल्यवान दागिने चोरीला गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

  • Share this:

अनिस शेख, प्रतिनिधी

लोणावळा, 02 जानेवारी : चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोराने एका 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना लोणावळ्यामध्ये घडली आहे.

रेशमा पुरुषोत्तम बंसल (वय 70) असं मृत महिलेचं नाव आहे. मयत रेश्मा या आपल्या पतीसोबत मागील अनेक वर्षांपासून लोणावळ्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या द्वारकामाई सोसायटीमध्ये राहतात. दररोज त्या नित्यनियमाने आपल्या पतीला जेवणाचा डबा देण्यासाठी दुकानावर जात असतात.

परंतु, आज त्या गेल्या नसल्यानं त्यांचे पती पुरुषोत्तम हे जेवण्यासाठी घरी आले असता घरातील पॅसेजमध्ये रेश्मा या बेशुद्ध अवस्थेत त्यांना आढळल्या. त्यानंतर त्यांनी शेजारी राहणाऱ्या रहिवाशांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.

स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर दाखल झाले. घराची पाहणी केली असता घरातील साहित्य इतरत्र पसरलेले आढळून आले. तसंच मौल्यवान दागिने चोरीला गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार, पोलिसांनी चोरीच्या उद्देशाने वयोवृद्ध महिलेचा खून झाला असल्याबाबतची तक्रार दाखल केली आह आहे.

परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेच्या आधारे लोणावळा शहर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

मुंबईत गळा चिरून महिलेची निर्घृण हत्या

दरम्यान, मुंबईतील विद्याविहार इथं सोमवारी एका महिलेचा मृतदेह मिळाला होता. या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले असल्याने अजूनही या महिलेची ओळख पटलेली नाही. पोलिसांना जेव्हा सोमवारी या महिलेचा मृतदेह सापडला तेव्हा तिचा एका पाय गायब होता. आता एका नाल्यामध्ये हा पायाचा तुकडा सापडला आहे.

पोलिसांकडून मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आहे. मात्र मृतदेह छिन्न-विछिन्न अवस्थेत असल्याने महिलेची ओळख पटू शकली नाही. विद्याविहारमधील नवल गेटसमोर सोमवारी एका महिलेचा बेडशीटमध्ये गुंडाळलेला मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह नजरेस आल्यानंतर तिथून जाणाऱ्या लोकांनी याबाबतची माहिती घाटकोपर पोलिसांनी दिली होती.

पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तसंच नंतर या मृतदेहाचा पंचनामाही करण्यात आला. सध्या पोलीस घाटकोपरमधील विविध ठिकाणी असणारे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहात आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार या महिलेची हत्या दुसऱ्या ठिकाणी झाली. हत्येनंतर आरोपीने हा मृतदेह घाटकोपरमध्ये आणून फेकला.

'सगळ्यात आधी मृतदेहाची ओळख पटवणे गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही गायब असणाऱ्या लोकांची यादी तपासून पाहात आहोत,' अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. घाटकोपर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. तसंच याप्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2020 07:25 PM IST

ताज्या बातम्या