मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Shopkeeper Murder : फुकट पानमसाला दे; नाही म्हणताच, माथेफिरूने थेट डोक्यात रॉड घालून केली हत्या

Shopkeeper Murder : फुकट पानमसाला दे; नाही म्हणताच, माथेफिरूने थेट डोक्यात रॉड घालून केली हत्या

उत्तर प्रदेशातल्या रायबरेलीत गुटख्यामुळे एका वृद्धाला आपला जीव गमवावा लागला आहे.

उत्तर प्रदेशातल्या रायबरेलीत गुटख्यामुळे एका वृद्धाला आपला जीव गमवावा लागला आहे.

उत्तर प्रदेशातल्या रायबरेलीत गुटख्यामुळे एका वृद्धाला आपला जीव गमवावा लागला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

रायबरेली, 07 फेब्रुवारी : गुन्ह्यांचं प्रमाण हल्ली खूप वाढलं आहे. किरकोळ वादातून किंवा अगदी 5-50 रुपयांवरून झालेल्या वादातून अनेकांना जीव गमवावे लागल्याच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. लहान लहान गोष्टींवरून झालेला वाद वाढून एखाद्याची हत्या होते. काही जण तर स्वतःची चूक असूनही समोरच्याला इजा पोहोचवण्यास किंवा त्यांचा जीव घेण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. अशीच एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एका तरुणाने दुकानदार वृद्धाचा क्षुल्लक कारणावरून जीव घेतला आहे.

उत्तर प्रदेशातल्या रायबरेलीत गुटख्यामुळे एका वृद्धाला आपला जीव गमवावा लागला आहे. रायबरेलीमध्ये फुकट पानमसाला दिला नाही म्हणून एका तरुणाने वृद्धाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. हत्येत वापरलेल्या लोखंडी रॉडसह पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली आहे. मारेकरी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचं सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा : दिराने लाज सोडली, वहिणीचा अंघोळीचा व्हिडीओ केला रेकॉर्ड अन्... बीडमधील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उंचाहार कोतवाली भागातल्या अर्खाजवळच्या करसेनी गावातलं आहे. 72 वर्षांचे रामफेर गौतम जनरल स्टोअर चालवायचे. जनरल स्टोअरमध्ये इतर वस्तूंसह पान मसालादेखील विकायचे. एका दिवसापूर्वी गावातला रहिवासी संतलाल वर्मा पानमसाला घेण्यासाठी रामफेर यांच्या दुकानात पोहोचला. संतलाल पैसे न देता पानमसाला मागत होता. त्यामुळे रामफेरने नकार दिला.

संतलाल पूर्वीही पैसे न देता पानमसाला घेऊन जायचा. त्यामुळे या वेळी फुकटात पानमसाला न मिळाल्याच्या रागात तो बडबडत निघून गेला. रात्री रामफेर नेहमीप्रमाणे घराच्या व्हरांड्यात झोपला असताना संतलाल तिथं पोहोचला. तिथं त्याने रामफेरच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. हा हल्ला इतका जोराचा होता, की रामफेरचा जागीच मृत्यू झाला.

हे ही वाचा : आधी केले शारीरिक अत्याचार मग विळ्यानं कापला गळा; आईच्या वयाच्या महिलेसह 16 वर्षांच्या मुलाचं कृत्य

माहिती मिळताच पोलिसांनी गावात पोहोचून मृत मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून संतलालला अटक केली. अपर पोलीस अधीक्षक विश्वजित श्रीवास्तव यांनी सांगितलं, की पानमसाला न दिल्याने मानसिकदृष्ट्या अस्वस्थ तरुणाने एका वृद्धाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली, यातच त्याचा मृत्यू झाला.

पानमसाला न देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणातल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या मानसिकदृष्ट्या अक्षम असलेल्या तरुणाने किरकोळ कारणावरून त्या वृद्धाचा निर्घृण खून केला. या घटनेनंतर गावकरी संताप व्यक्त करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Murder news, Uttar pradesh, Uttar pradesh news