Home /News /crime /

पुण्यातील धक्कादायक घटना! IT कंपनीतील तरुणीवर कॅब चालकाचा बलात्कार; गुंगीचं औषध देऊन अत्याचार

पुण्यातील धक्कादायक घटना! IT कंपनीतील तरुणीवर कॅब चालकाचा बलात्कार; गुंगीचं औषध देऊन अत्याचार

Rape in Pune: पुण्यातील आयटी कंपनीतील तरुणीवर एका कॅब चालकाने बलात्कार केल्याची (Cab driver raped IT girl) धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी चालकाने पीडित तरुणीला पाण्यातून गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला आहे.

    पुणे, 11 एप्रिल: पुण्यातील आयटी कंपनीतील तरुणीवर एका कॅब चालकाने बलात्कार केल्याची (Cab driver raped IT girl)धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी चालकाने पीडित तरुणीला पाण्यातून गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला आहे.  नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडित तरुणीचे अश्लील फोटोही काढले आहेत. या फोटोच्या अधारे त्याने ब्लॅकमेल करत पीडितेवर अनेकदा बलात्कार केला आहे. याप्रकरणी पीडित युवतीने हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी कॅब चालकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे. संबंधित आरोपीचं नाव प्रमोद बाबु कनोजिया असून तो पुण्यातील कर्वेनगर परिसरात राहतो. त्याने पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या 32 वर्षीय तरुणीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे. तसेच अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला आहे. संबंधित घटना 4 ते 30 एप्रिल दरम्यान घडली आहे. दैनिक पुढारीने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित तरुणी खराडी येथील रहिवासी असून पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करते. तर आरोपी ओला चालक आहे. पीडित तरुणीचे नवऱ्यासोबत पटत नसल्यानं ती आपल्या पतीपासून विभक्त राहते. एकेदिवशी कंपनीतील काम संपवून पीडित तरुणीने पहाटे चार वाजता कॅब बुक केली होती. यावेळी आरोपी तरुण कॅब घेऊन पीडितेला घेण्यासाठी आला. यावेळी त्याने पीडितेचा मोबाइल नंबर आपल्याकडे सेव्ह करून ठेवला. त्यानंतर त्याने पीडितेला फोन करून सांगितलं की, लॉकडाऊनमुळे कॅबला भाडं मिळत नाहीये, जेव्हा गरज असेल तेव्हा फोन करून सांगाल. (हे वाचा- बँड-बाजासह बलात्काराच्या आरोपीच्या घरी पोहचले पोलीस, Video Viral) यानंतर एकेदिवशी पीडित तरुणीने सकाळी सातच्या सुमारास धनकवडीला जाण्यासाठी कॅब चालकाला फोन केला. यावेळी धनकवडीकडे जात असताना कॅब चालकाने पाणी प्यायचं आहे का? असं विचारलं. आणि पीडित तरुणीला गुंगीचं औषध टाकलेलं पाणी प्यायला दिलं. यावेळी गुंगी आल्यामुळे पीडितेला आपण कुठे जात आहोत, हेच काळालं नाही. सकाळी अकराच्या सुमारास जेव्हा तिला शुद्ध आली, तेव्हा ती धायरीतील एका लॉजमध्ये होती. यावेळी पीडितेनं आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिचं तोंड दाबलं आणि तिचे मोबाइलमध्ये काढलेले अश्लील फोटो दाखवले. (हे वाचा- एकतर्फी प्रेमातून भारतीय तरुणीची ऑस्ट्रेलियात हत्या, 400 किमी दूर पुरला मृतदेह) यानंतर त्याने अश्लील फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देत, 04 ते 30 एप्रिल दरम्यान तिच्यावर अनेकदा बलात्कार केला आहे. याप्रकरणी पीडितेन हडपसर पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपी कॅब चालकाला अटक करण्यात आली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pune, Rape

    पुढील बातम्या