मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /महिला पत्रकारासमोर ओला कॅब ड्रायव्हरचं हस्तमैथुन! घाबरलेल्या महिलेनं जे केलं ते पाहून चालकाचं पलायन

महिला पत्रकारासमोर ओला कॅब ड्रायव्हरचं हस्तमैथुन! घाबरलेल्या महिलेनं जे केलं ते पाहून चालकाचं पलायन

बंगळुरूमध्ये (Bangalore) एका महिला पत्रकाराला (Lady Journalist) कॅबमधून घेऊन जाताना ड्रायव्हरने तिच्यासमोर अश्लील वर्तन केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित महिलेने आरडाओरडा केल्यानंतर ड्रायव्हर पळून गेला.

बंगळुरूमध्ये (Bangalore) एका महिला पत्रकाराला (Lady Journalist) कॅबमधून घेऊन जाताना ड्रायव्हरने तिच्यासमोर अश्लील वर्तन केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित महिलेने आरडाओरडा केल्यानंतर ड्रायव्हर पळून गेला.

बंगळुरूमध्ये (Bangalore) एका महिला पत्रकाराला (Lady Journalist) कॅबमधून घेऊन जाताना ड्रायव्हरने तिच्यासमोर अश्लील वर्तन केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित महिलेने आरडाओरडा केल्यानंतर ड्रायव्हर पळून गेला.

    बंगळुरू, 4 डिसेंबर : एका महिला पत्रकाराला (Lady Journalist) कॅबमधून घेऊन जाताना ड्रायव्हरने तिच्यासमोर अश्लील वर्तन केल्याची घटना नुकतीच कर्नाटकच्या राजधानीचं शहर असलेल्या बंगळुरूमध्ये (Bangalore) घडली आहे. संबंधित महिलेने आरडाओरडा केल्यानंतर ड्रायव्हर पळून गेला. आता पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ओला कंपनीच्या कॅबमध्ये हा प्रकार घडला असून, महिला पत्रकाराच्या तक्रारीनंतर ओला कंपनीने संबंधित ड्रायव्हरला निलंबित केलं आहे. पोलीस तपास सुरू असून, हा अनुभव हादरवून टाकणारा असल्याचं या महिला पत्रकाराने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे.

    कॅब ड्रायव्हर्सकडून अशा प्रकारचं वर्तन घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशा काही घटना घडल्या आहेत आणि त्यांना शिक्षाही झालेली आहे; मात्र तरीही असे प्रकार थांबलेले नाहीत हे दुर्दैव असल्याची खंत व्यक्त होत आहे. ज्या महिला पत्रकाराच्या बाबतीत हा प्रसंग घडला, तिने या दुर्दैवी घटनेची माहिती ट्विट करून दिली. तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे, 'ज्या शहराला मी माझं घर म्हणते, तिथे आज मला असुरक्षित असल्याचं जाणवलं. काम संपवून मी घरी येत होते, तेव्हा ओला कॅबचा ड्रायव्हर माझ्या समोरच हस्तमैथुन (Masturbation) करत होता. त्याला असं वाटत होतं, की माझं त्याच्याकडे लक्ष नाही. नंतर तो असं भासवू लागला, की तो काही चुकीचं करत नाहीये. त्याच वेळी मी आरडाओरडा करायला सुरुवात केली. तेव्हा त्याने कॅब थांबवली. माझं दुर्दैव असं, की कॅब तेव्हा अंधाऱ्या रस्त्यावर होती. कॅब (OLA Cab) थांबवल्यावर मी उतरले आणि त्याने पळ काढला. नशीब चांगलं होतं, म्हणून मला थोड्या वेळातच दुसरी कॅब मिळाली.'

    फेसबुकवरील मित्रानं केला घात, आधी रेप केला मग पीडितेच्या वडिलांकडे मागितले 10लाख

    'कॅबमध्ये इमर्जन्सी नंबर (Emergency Number) देण्यात आलेला होता; मात्र अशा परिस्थितीत असताना या गोष्टी लक्षात येत नाहीत. पहिला प्रयत्न असा असतो, की आधी तिथून बाहेर पडायचं आणि तसंच मी केलं. ओलाकडून कळलं, की त्यांनी त्या ड्रायव्हरला सस्पेंड केलं; पण अशी परिस्थिती असेल, तर आम्ही काम संपवून घरी येत असताना आम्हाला सुरक्षित कसं वाटू शकेल? की आम्ही काम करणंच थांबवू?' असा सवालही या पत्रकाराने उपस्थित केला आहे.

    बेंगळुरू शहराचे पोलिस आयुक्त कमल पंत यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांची एक टीम पाठवण्यात आली असून, आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल, असं पंत यांनी त्या महिला पत्रकाराच्या ट्विटला उत्तर देताना सांगितलं.

    First published:
    top videos