Home /News /crime /

महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवत नातेवाईकांना पाठवले अश्लील फोटो, सहकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवत नातेवाईकांना पाठवले अश्लील फोटो, सहकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Pune Crime: पुण्यातील आरोपी तरुणानं एका महिलेसोबत संबंध (Sexual relation) प्रस्थापित करताना, तिच्या संमतीशिवाय अश्लील फोटो काढले आणि हे फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवून तिची समाजात बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे.

    हिंगोली, 11 मे: कंपनीत सोबत काम करणाऱ्या एका महिलेचे अश्लील फोटो (Obscene photo) तिच्या नातेवाईकांला पाठवून समाजात बदनामी करणाऱ्या तरुणाविरुद्ध कळमनुरी पोलिसांत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. आरोपी तरुणाने पीडित महिलेसोबत संबंध (Sexual relation) प्रस्थापित करताना, तिच्या संमतीशिवाय अश्लील फोटो काढले आणि हे फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवून तिची समाजात बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील रहिवासी असणारी एक महिला काही दिवसांपूर्वी तिच्या कुटुंबीयांसोबत पुण्यात कामानिमित्त आली होती. दरम्यानच्या काळात पुण्यातील एका कंपनीत काम करत असताना तिची ओळख कंपनीत काम करणाऱ्या सागर सुनील मोरे नावाच्या तरुणाशी झाली. याच ओळखीतून त्यांची जवळीक वाढत गेली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. त्यानंतर आरोपी तरुणाने पीडित महिलेशी शारीरिक संबंधही प्रस्थापित केले आणि तिच्या संमतीविना तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. हे ही वाचा-'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी आरोपी सागर मोरे एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने संबंध प्रस्थापित करतानाचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ पीडित महिलेच्या नातेवाईकांना पाठवून तिची बदनामी केली आहे. आरोपी तरुणाच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं कळमनुरी पोलीस ठाण्यात पुण्यातील हडपसर येथील रहिवासी असणाऱ्या सागर सुनील मोरे नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप आरोपी तरुणाला अटक करण्यात आली नसून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune

    पुढील बातम्या