Home /News /crime /

बंदीनंतरही विक्री सुरू, नायलॉनच्या मांजानं कापला आणखी एका तरुणाचा गळा!

बंदीनंतरही विक्री सुरू, नायलॉनच्या मांजानं कापला आणखी एका तरुणाचा गळा!

पोलिसांची कारवाई, सरकारी बंदी यानंतरही नायलॉन मांज्याच्या (nylon manza) विक्रीचे प्रकार सुरूच आहेत. नाशिकमध्ये (Nashik) या मांज्यामुळे महिलेचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका तरुणाचा गळा त्यामुळे कापला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुढे वाचा ...
नाशिक, 7 जानेवारी : पोलिसांची कारवाई आणि सरकारी बंदीनंतरही नायलॉन मांज्याच्या (nylon manza) विक्रीचे प्रकार सुरुच आहेत. नाशिकमध्ये (Nashik) या मांज्यामुळे महिलेचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका तरुणाचा गळा त्यामुळे कापला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काय घडली घटना? नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील मयूर कुलकर्णी या जीवघेण्या नायलॉन मांज्यामुळे जखमी झाले आहेत. ते गाडीवर जात असताना त्यांचा गळा या मांज्यामुळे कापला गेला. मयुर कुलकर्णी यांच्या गळ्याला सात टाके पडले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपयाचार सुरू आहेत. नाशिकमधील दुसरी घटना नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी भारती जाधव या महिलेचा दुचाकीवरुन घरी जात असताना नायलॉन मांज्यामुळे गळा चिरुन मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी शहरातील या विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली होती. या कारवाईनंतरही शहरात हे प्रकार सुरूच असल्याचं समोर आलं आहे. नागपुरातही घडला होता प्रकार नायलॉन मांज्यामुळे जखमी होण्याचे प्रकार हे नाशिकपुरतेच मर्यादीत नाहीत. तर विदर्भाताल नागपुरमध्येही (Nagpur) काही दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता. नागपुरमधील आदित्य भारद्वाज या तरुणाचा गळा नायलॉनचा मांजा अडकल्यामुळे कापला गेला होता. गोधनी-मानकापूर रोडवरील नायलॉन मांजा त्याच्या गळ्याला गुंडाळला गेला. दुचाकी वेगात असल्यामुळे गळा कापला गेला आणि तो गाडीवरून पडला आणि गंभीर जखमी झाला. डॉक्टरांनी त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया केली आणि त्याचे प्राण थोडक्यात बचावले. (हे वाचा-तपासणी वेळी पोलिसांवर हल्ला करुन पळण्याचा चोराचा प्रयत्न, पाहा VIDEO) राज्य सरकारनं 1986 पर्यावरण संरक्षण कायदा कलम 5 नुसार मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली आहे. बंदी असतानाही बाजारपेठेत चायनीज व नायलॉन मांजाची धडाक्यात विक्री सुरू आहे. या घातक मांजावरील बंदी ही केवळ कागदावरच ठरत आहे. हा मांजा नागरिकांसह पशुपक्ष्यांच्या गळ्याचा फास ठरत आहे. नागरिकांना चालताना किंवा वाहन चालवताना जीव मुठीत घेऊन रस्त्यानं जावं लागतं. अनेक पक्षी, प्राणी, मनुष्य जखमी होतात किंवा प्रसंगी मृत्युमुखी पडतात. तसंच अनेक ठिकाणी यामुळे विजेच्या तारांचे शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकारही घडले आहेत.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Crime, Nashik

पुढील बातम्या