तुषार कोहळे, प्रतिनिधी
नागपूर, 01 मे : फेसबुकवर (facebook fake friend request) एका तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट येते आणि काही दिवसांनी दोघांमध्ये चॅटिंग सुरू होते. पण पुढे व्हिडीओ कॉल करून न्यूड व्हिडीओ चॅट (facebook nude video chat) करणे एका विवाहित तरुणाच्या चांगलेच अंगलट आले. अखेर पोलिसांनी या प्रकारातून विवाहित तरुणाची कशीबशी सुटका केली.
घडलेली हकीकत अशी की, नागपूरमध्ये एका तरुणाला फेसबुकवर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती फ्रेंड रिक्वेस्ट होती एका मुलीची. ती त्याने स्वीकारली. त्यांनतर दोघांमध्ये मैत्री वाढली, रोजच्या ऑनलाई चॅटिंगने मैत्री आणखी घट्ट झाली. हळूहळू ते सेक्स चॅट (Sex chat) करू लागले. सुरुवातीचा सेक्स चॅटनंतर व्हिडीओ चॅटपर्यंत गेला. त्या मुलीने त्याला न्यूड व्हिडीओ चॅट करायची विनंती केली. त्या तरुणाने ती मान्य केली व त्यांच्यात पुढे न्यूड व्हिडीओ चॅट सुरू झाले. पीडित तरुणाला माहीतच नव्हते की हा रोमान्सचा फ्रॉड प्रकार आहे. तो अलगद त्या तरुणीच्या जाळ्यात अडकला.
त्या तरुणीने तिला हवे असलेले न्यूड चॅटिंगचे सर्व व्हिडीओ स्वतःकडे रेकॉर्ड करून ठेवले आणि त्या नंतर पुढे आला त्या तरुणीचा पीडित तरुणाला फेसबुकवर फ्रेंड बनवण्याचा उद्देश. त्या तरुणीने पीडित मुलावरच आरोप केले की, 'तू मला फसवले आता याचा तुला मोबदला द्यावा लागेल'. त्यामुळे त्या तरुणीने याला पैशाची मागणी केली व तरुणांच्या पायाखालची मातीच सरकली. त्या मुलीचे या तरुणाला रोज ब्लॅकमेलिंगचे कॉल येऊ लागले. रोज पैशाची डिमांड वाढू लागली. एक वेळ अशी आली होती की, या तरुणांच्या मनात आत्महत्येचा विचार येत होता. मात्र, त्याने मोठ्या हिंमतीने बायकोला सर्व प्रकार सांगितला.
त्यांनतर त्यांनी नागपूर पोलिसांचे सायबर सेल गाठले. घटनेची सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. पोलिसांना लगेच लक्षात आले की, हा रोमान्स फ्रॉडचा प्रकार आहे. त्यांनतर पोलिसांनी त्या पीडित तरुणांचे फेसबुक अकाऊंट बंद केले, जीमेल बंद केले. आणि दोन दिवस मोबाईल बंद ठेवायला सांगितला. सध्या तरी या तरुणांची आरोपी तरुणीच्या जाळ्यातून सुटका झाली.
मात्र, अनेक लोकं फेसबुक फ्रेंडच्या जाळ्यात अडकतात, सेक्स चॅटपासून, न्यूड व्हिडीओ कॉलिंग पर्यंत पोहचतात व मग त्यांची फसवणूक सुरू होते. नुसती फसवणूक नाही एकाप्रकारे त्यांच्याकडून या तरुणीने भीती दाखवून खंडणी वसूल करतात. या ट्रॅपमध्ये विवाहित पुरुषांपासून तरुण व वयोवृद्ध नागरिक फसतात. त्यामुळे नागरिकांनी या फ्रॉड च्या घटनेपासून सावध राहावे, असे नागपूर सायबर सेलचे अशोक बागुल यांनी सांगितले.
सध्या सायबर क्राईममध्ये ज्या गुन्ह्याचे चलन आहे. यात ट्रॅप करून सोशल मीडिया फ्रॉड, सिम्पती फ्रॉड, रोमान्स फ्रॉडचा समावेश आहे. यासह बँकिंग फ्रॉड, एटीएम व्हेरिफिकेशन फ्रॉड, केवायसी फ्रॉड, ऑनलाईन शॉपिंग फ्रॉड, अटॅक ऑन युअर कॉम्प्युटर फ्रॉड, सायबर स्टोकिंग, सायबर पुलिंग, जॉब फ्रॉड्स, Olx फ्रॉड्सच्या पॅटर्नमध्ये लोकं फसत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना सर्वांनी काळली घेण्याची त्यांनी विनंती केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.