मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पती-पत्नीचे एकमेकांवर जुगारी असल्याचे आरोप, पोलीसही चक्रावले

पती-पत्नीचे एकमेकांवर जुगारी असल्याचे आरोप, पोलीसही चक्रावले

पती-पत्नीच्या भांडणातील एक विचित्र प्रकरण समोर आलंय. या प्रकरणामुळे पोलिसांसमोरचाही गुंता वाढला आहे.

पती-पत्नीच्या भांडणातील एक विचित्र प्रकरण समोर आलंय. या प्रकरणामुळे पोलिसांसमोरचाही गुंता वाढला आहे.

पती-पत्नीच्या भांडणातील एक विचित्र प्रकरण समोर आलंय. या प्रकरणामुळे पोलिसांसमोरचाही गुंता वाढला आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 7 डिसेंबर : पती-पत्नीच्या भांडणातील  एक विचित्र प्रकरण समोर आलंय. या प्रकरणात पती आणि पत्नीने एकमेकांवर आरोप केले आहेत; पण या दोघांपैकी नेमकं कोण खरं, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. एका महिलेच्या पतीने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला होता. पत्नीने लुडोमध्ये पैज लावण्यासाठी आपले पैसे वापरल्याचा दावा केला होता.

  रेणू नावाच्या महिलेने पैज लावण्यासाठी पैसे नसल्यामुळे स्वतःला पणाला लावले आणि ती घरमालकाकडून हरली, असा आरोप या महिलेच्या पतीने केला होता. या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. या महिलेने पतीलाच जुगाराचं व्यसन असल्याचा दावा पोलिसांसमोर केला आहे. 'इंडिया टुडे'ने हे वृत्त  दिलं आहे.

  काय आहे प्रकरण?

  उत्तर प्रदेशातल्या प्रतापगढ जिल्ह्यातल्या एका महिलेला लुडो खेळायचं व्यसन होतं. एके दिवशी ती तिच्या घरमालकाकडून खेळात हरली. त्यानंतर ती घरमालकासोबत राहू लागली. महिलेचा पती जयपूरमध्ये काम करतो. या महिलेचा पती उमेश याने या घटनेची पोलिसांत तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, तो सहा महिन्यांपूर्वी कामासाठी जयपूरला गेला होता. त्यानंतर लुडोचं व्यसन असलेल्या त्याच्या पत्नीने घरातले सर्व पैसे जुगारावर खर्च केल्याचा आरोप केला होता; पण आता या प्रकरणात नवीन वळण आलंय. त्या महिलेने आता असा दावा केला आहे, की तिला जुगाराचं व्यसन नसून तिच्या नवऱ्याला आहे. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणात नक्की कोण दोषी आहे, याचा शोध घेत आहेत.

  7 वर्षांपासून जिच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत होता ती तरुणी जिवंत सापडली

  महिलेने दिलेल्या माहितीनुसार, "माझ्या पतीला जुगार खेळण्याचं व्यसन आहे. मला अशा कोणत्याही वाईट सवयी नाहीत. मी दुसऱ्यांच्या घरी घरकाम करते आणि कष्ट करून उदरनिर्वाह करते," असं महिलेने पोलिसांना सांगितलं. दरम्यान, रेणूच्या पतीन हे सर्व आरोप फेटाळले आहेत. पतीच्या दाव्यानुसार  सहा महिन्यांपूर्वी तो जयपूरला कामासाठी गेला होता आणि तिथून त्याच्या पत्नीला पैसे पाठवत होता, ते पैसे त्याची पत्नी जुगार खेळण्यासाठी वापरत होती. पैसे संपल्यानंतर तिने लुडोमध्ये स्वतःलाच पणाला लावलं आणि त्यात ती हरली.

  कहर झाला! लग्नाची तयारी सुरू असतानाच प्रियकरासोबत पळून गेली नवरीची आई

  आपली पत्नी आता घरमालकाकडे राहू लागली आहे. "तिने त्याला सोडून द्यावं, यासाठी मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला; पण ती माझं ऐकत नाहीये. ती त्याला सोडायला तयार नाही," असा दावा त्याने केलाय. दरम्यान, या विचित्र प्रकरणात नेमकं काय घडलंय आणि दोषी कोण आहे, याची उकल करण्यासाठी पोलीस आता उमेशचा शोध घेत आहेत.

  First published:

  Tags: Crime news, Uttar pardesh, Wife and husband