आदित्य कुमार (नोएडा),01 एप्रिल : नोएडामध्ये एक धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. दोन भावांनी मिळून आपल्या जादुई आवाजातून बऱ्याच लोकांना फसवले आहे. नोएडा पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी दोन भावांना अटक केली. या दोन्ही भावांनी मिळून मुलींचा आवाज काढून बऱ्याच लोकांना फसवल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याची चाचपणी करण्यासाठी या मुलांना मुलींचा आवाज काढण्यास सांगितले. हा आवाज पोलिसांनी सोशल मिडीयावर व्हायरल करत लोकांना जागृत राहण्याचे आवाहन केले.
केतन अरोरा आणि चिराग अरोरा या दोन भावांना सेक्टर-58 पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे भाऊ बेरोजगार तरुणांना नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक करायचे. अतिरिक्त डीसीपी नोएडा शक्ती अवस्थी म्हणतात यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला एक व्हायरल व्हिडीओ मिळाला यामध्ये मुलींचा आवाज काढणारा व्यक्ती हा मुलगा असल्याचे आढळून आले.
हद्द झाली! बापट यांच्या निधनानंतर 48 तासांत भावी खासदाराचं बॅनर, भाजप नेता ट्रोल
5 मार्च रोजी एका पीडितेने पोलिस ठाण्यात 1 लाख 83 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणाच्या तपासात असे आढळून आले की, केतन अरोरा आणि चिराग अरोरा हे दोन भाऊ फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया साइटवर बनावट पेज तयार करायचे.
ज्याद्वारे लोक मुलींचे नंबर घेऊन फोनवर बोलायचे. लोकांना नोकऱ्या देण्यासाठी ते बोलत असत. मुलीचा आवाज ऐकून प्रोसेसिंग फी वगैरेच्या नावाखाली पैसे घेऊन लोकांची फसवणूक करायचे.
'सलमान और तू फिक्स'; संजय राऊतांना लॅारेन्स बिश्नोईकडून जीवे मारण्याची धमकी
पोलिसांच्या माहितीनुसार, मागच्या दोन वर्षांपासून ते फसवणूक करायचे. हे दोघेही राज नगर एक्स्टेंशन येथील घरातून संपूर्ण व्यवसाय चालवत होते. त्याची पाच खाती जप्त करण्यात आली आहेत. त्यांनी किती लोकांची फसवणूक केली आणि किती पैशांचा व्यवहार केला, याचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Uttar pradesh, Uttar pradesh news