मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

कॉल गर्ल्सच्या Online सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 5 ते 20 हजारात व्हायचा असा व्यवहार

कॉल गर्ल्सच्या Online सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 5 ते 20 हजारात व्हायचा असा व्यवहार

राजस्थानातल्या बाडमेरमध्ये गोल्डन स्पा नावाने स्पा सेंटर चालवलं जात होतं. त्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला. तिथे 5 तरुणींना आणि 2 युवकांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.

राजस्थानातल्या बाडमेरमध्ये गोल्डन स्पा नावाने स्पा सेंटर चालवलं जात होतं. त्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला. तिथे 5 तरुणींना आणि 2 युवकांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.

संबंधित आरोपी व्हॉट्सअप नंबरद्वारे लोकांशी संपर्क साधत असत आणि त्यांच्याशी व्यवहार ठरवायचे. सौदा झाल्यावर हे लोक मुलींना हॉटेल, घर, फार्म हाऊस इत्यादी ठिकाणी गाडीने घेऊन जात असत.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 20 जून :  कॉल गर्ल्सच्या ऑनलाइन टोळीचा भांडाफोड (Online Sex Racket) करण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून एक कार, तीन मोबाइल फोन आणि 24,930 रुपये रोकड जप्त केली आहे. अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी इतर आरोपींना पकडण्यासाठी आता छापेमारी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 19 जून रोजी एएचटीयू पोलिसांच्या पथकानं ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून अवैध वेश्या व्यवसायात गुंतलेल्या टोळीचा भांडाफोड केला आणि बुद्धीमान लामा आणि मोनू या नावाच्या या दोन आरोपींना अटक केली. आरोपींनी सांगितले की, ते व्हॉट्सअप नंबरद्वारे लोकांशी संपर्क साधत असत आणि त्यांच्याशी बोलत असत. सौदा झाल्यावर हे लोक मुलींना हॉटेल, घर, फार्म हाऊस येथे गाडीने घेऊन जात असत. नोएडा पोलिसांच्या एएचटीयू (अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिट) ने या प्रकरणाचा छडा लावला आहे.

आरोपींनी सांगितले की, ग्राहकांकडून मोठी रक्कम घेण्यात येत होती. ते ग्राहकांकडून पैसे रोखीने गोळा करीत असे. ग्राहकांकडून पाच हजार ते 20 हजार रुपयांमध्ये व्यवहार निश्चित करण्यात येत होता. त्याच वेळी मुलींना मात्र प्रति ग्राहक 1500 रुपये दिले जात होते.

हे वाचा - ‘उद्धवजींनी विचार केला तर…’ प्रताप सरनाईकांच्या पत्रामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण, नेते म्हणाले….

नोएडा पोलिसांच्या एएचटीयू टीमला यांच्या व्हॉट्सअप क्रमांकाची माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी या टोळीशी ग्राहक म्हणून संवाद साधला आणि दोन मुली बुक केल्या. पोलिसांच्या पथकाने त्यांना एका गेस्ट हाऊससमोर येण्यास सांगितले. त्यावर दोन्ही आरोपी मुलींना त्यांच्या गाडीत बसवून पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणी आले. साध्या वेशातील पोलिसांनी त्यासाठी बाहेर अगोदरच सापळा रचला होता. स्टिंग ऑपरेशन करण्यात आले आणि दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. पोलीस पथक अटक केलेल्या आरोपींची चौकशी करत असून त्याद्वारे मिळणाऱ्या माहितीवरून पुढील कारवाई केली जात आहे.

First published:

Tags: Online crime, Sex racket