नवी दिल्ली, 5 एप्रिल : मुलीच्या लग्नासाठी हातात पैसे नव्हते, यासाठी महिलेने धक्कादायक कृत्य केल्याचं उघड झालं आहे. यासाठी महिलेने आणखी एका महिलेची मदत घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने मुलीच्या लग्नात पैशांची सोय करण्यासाठी एका मुलाला किडनॅप (Kidnap) करण्याचा धक्कादायत प्लान केला. मुलाला विकण्यापूर्वीच दिल्ली पोलिसंनी दोन्ही महिलांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेला आपल्या मुलीचं लग्न करायचं होतं. अशात पैशांची तरतूद करण्यासाठी महिलेने धक्कादायक पाऊल उचललं. महिलेने पैशांसाठी 2 वर्षांच्या मुलाचं अपहरण केलं. मुलाची विक्री करण्यापूर्वीच पोलिसांनी दोन्ही महिलांना अटक केली. या प्रकरणात मुलगा सुरक्षित आहे.
दिल्लीच्या किशनगड पोलीस स्टेशनमध्ये 2 एप्रिल रोजी एक सूचना मिळाली होती. त्यानुसार मुनिरका गावात राहाणाऱ्या 2 वर्षांचा अंश गायब झाला आहे. पोलिसांनी तातडीने या प्रकरणात तपास सुरू केला आणि जवळपासच्या लोकांची चौकशी केली. याशिवाय सीसीटीव्हीही तपासले. यादरम्यान पोलिसांना अंश गायब होण्यात निक्की उर्फ हिना नावाच्या महिलेचा हात आहे. पोलिसांनी तातडीने हिनाच्या घरी छापा मारला आणि अंशला सुरक्षितपणे त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात दिलं.
हे ही वाचा-चालत्या बसमधून प्रवाशांनी बाहेर मारल्या उड्या; 2 भावांसह तिघांचा जागीच मृत्यू
मुलाला विकण्याची होती तयारी...
स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलेची चौकशी केली. यावेळी समोर आलं की, बबलीच्या मुलीचं लग्न होणार होतं. त्यासाठी तिचा पैशांची गरज होती. यासाठी तिने आपली सहकारी हिनाला मुलं उचलण्यासाठी सांगितलं. या दोघांना मुल विकायचं होतं. त्यानंतर मोठी रक्कम मिळाल्यामुळे ती आपल्या मुलीचं लग्न करणार होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Delhi, Kidnapping, Marriage