• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • मृत्यूनंतरही सुटका नाही! एकीकडे आईचा मृतदेह, दुसरीकडे दोन्ही मुलांमध्ये हाणामारी

मृत्यूनंतरही सुटका नाही! एकीकडे आईचा मृतदेह, दुसरीकडे दोन्ही मुलांमध्ये हाणामारी

आईपेक्षाही आपआपसातील वाद इतका मोठा असतो का??

 • Share this:
  अमृतसर, 27 जून : जी आपल्याला पहिलं पाऊल टाकायला शिकवते ती आई. ती असताना बऱ्याच जणांना तिचं महत्त्व कळत नाही. मात्र ज्यांना आई नाही त्यांना कधी तरी विचारा त्या भळभळत्या जखमेविषयी. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एका वृद्ध आईच्या मृतदेहाशेजारी (Mothers Deadbody) तिची दोन्ही मुलं आणि सुना कचाकचा भांडताना दिसत आहे. त्या केवळ भांडतच नाही तर मारहाणही करू लागतात. आईचा मृतदेह शेजारी पडलेला असताना अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या मुलांवर सोशल मीडियातून टीका केली जात आहे. वृद्ध महिलेच्या मृतदेहावरुन दोन भावांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. ही घटना पंजाबमधील मुक्तसर साहब गावातील आहे. या गावातील एका वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या मोठ्या मुलाच्या घरी आलेला लहान मुलगा आणि त्याची पत्नी यांच्यामध्ये वाद झाला. यावेळी दोघांमध्ये मारहाण झाली. हे ही वाचा-महाराष्ट्र हादरला! छळ करुनही समाधान नाही, सासरच्यांनी विष देऊन सुनेला संपवलं सोथा निवासी मंगा सिंग यांनी सांगितलं की, ते काही दिवसांपूर्वी एका लग्नासाठी येथे आले होते. तिच्या छोट्या जावेने तिला मारहाण केली. याबाबत 18 जून रोजी पोलिसांकडे तक्रारही करण्यात आली होती. परंतू पोलिसांनी कारवाई केली नाही. तर त्या काळात तिच्या वृद्ध आईचा मृत्यू झाला. त्यांनी या प्रकरणात न्यायाची मागणी केली आहे. मात्र त्यांना आपल्या वृद्ध आईच्या मृतदेहाचाही विसर पडला. पंजाब केसरीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. दोन्ही भाऊ आपल्या पत्नीसह एकमेकांशी भांडण करू लागले. आईच्या मृतदेहाशेजारी दोन्ही मुला-सूनांची भांडणं सुरू असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा प्रकार बराच वेळ सुरू असल्याने शेवजी पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला. दोन्ही मुलांची समजून काढून आधी वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आलं.
  Published by:Meenal Gangurde
  First published: