मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

निर्भया प्रकरण: फाशीआधी निघणार ब्लॅक वॉरंट, जाणून घ्या कशी असते प्रक्रिया

निर्भया प्रकरण: फाशीआधी निघणार ब्लॅक वॉरंट, जाणून घ्या कशी असते प्रक्रिया

 ब्लॅक वॉरंट काढल्याशिवाय फाशी दिली जात नाही. फाशी देण्यासाठी ते सर्वात महत्त्वाचं असतं.

ब्लॅक वॉरंट काढल्याशिवाय फाशी दिली जात नाही. फाशी देण्यासाठी ते सर्वात महत्त्वाचं असतं.

ब्लॅक वॉरंट काढल्याशिवाय फाशी दिली जात नाही. फाशी देण्यासाठी ते सर्वात महत्त्वाचं असतं.

    नवी दिल्ली, 18 डिसेंबर : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी चारही आरोपींची फाशी कायम ठेवण्यात आली आहे. या प्रकरणाती चार दोषींपैकी एक असलेल्या अक्षय ठाकुरच्या फाशीला रद्द करावी अशी मागणी न्यायालयात केली होती. ही पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आरोपींची फाशी कायम राहणार आहे. या सुनावणीवेळी दोषी अक्षयच्या वकीलांनी सत्ययुग ते त्रेतायुगाचे दाखले देत फाशी न देण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी मुकेश, पवन, अक्षय, विनय यांना फाशीच्या फासावर चढवण्यात येणार आहे. फाशी देण्यासाठी ब्लॅक वॉरंट कधी निघणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ब्लॅक वॉरंट म्हणजे नेमकं काय? कोण काढतं हे वॉरंट याबाबत जाणून घेऊया. ब्लॅक वॉरंट म्हणजे दोषींना दिल्या जाणाऱ्या फाशीचा आदेश देणारं पत्र असतं. यामध्ये आरोपींना फाशी कधी द्यावी याबाबत लिहिलेलं असतं. त्या वेळेनुसार आरोपीला तुरुगांतून बाहेर काढलं जातं. काही वेळा कैद्याला खांद्यावर उचलून फाशीच्या ठिकाणापर्यंत नेण्यात येतं. त्याचं कारण असं की आपल्याला आता फासावर चढवणार या भीतीनं कैद्याचे हातपाय लटपटायला लागतात. त्यामुळे त्यांना चालताही येत नाही. आरोपीला फाशीच्या दोरखंडापर्यंत आरोपीचा चेहरा काळ्या कपड्यानं झाकून घेण्यात येतो. त्यामुळे आजूबाजूला नेमकं काय घडतंय हे आरोपीला समजू नये याची संपूर्णपणे खात्री घेतली जाते. वाचा-...आणि भर कोर्टात ढसाढसा रडायला लागली निर्भयाची आई; वडिलांचे डोळेही पाणावले ब्लॅक वॉरंट काढल्यानंतर स्वतंत्र हिंदुस्तानातील फासावर चढणारे अनुक्रमे 58, 59, 60 आणि 61 असे गुन्हेगार असणार आहेत. देशातील पहिली फाशी राष्ट्रपती महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेंना देण्यात आली होती. तर 2015 रोजी 57 क्रमांकाची याकूब मेमन यांना शेवटची फाशी देण्यात आली होती. त्यानंतर 2016 ते 2019 या मधल्या काळात कोणालाही फाशी दिली गेली नाही. त्यामुळे ब्लॅक वॉरंट निघाल्यानंतर आता हे चार जण 58, 59, 60 आणि 61 क्रमांकानुसार फासावर चढणार आहेत. त्यामुळे त्या अनुक्रमाने त्यांच्या ब्लॅक वॉरंटवर निघाल्यानंतर तशा पद्धतीनं त्यांना फासाच्या फंद्याजवळ आणण्यात येणार आहे. तिहार जेलच्या तीन नंबर सेलमध्ये फाशी देण्यासाठी विशेष कोठडी तयार करण्यात आली आहे. या बिल्डिंगमध्ये एकूण 16 डेथ सेल आहेत. फाशीची शिक्षा देण्यात आलेल्या कैद्यांना या डेथ सेलमध्ये ठेवण्यात येतं. त्यांना एकटं ठेवण्यात येतं. कोणासोबत बोलण्याची परवानगी त्यांना नसते. फाशी देण्याच्या आधी 24 तासांपैकी फक्त अर्धातास आरोपीला सेल बाहेर काढण्याची परवानगी असते. डेथ सेलचा पहारा तमिळनाडूचे विशेष पोलीस देतात. दोन तासांच्या शिफ्टमध्ये फक्त ज्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली आहे त्यांच्यावर कडक नजर ठेवण्याची जबाबदारी या पोलिसांवर असते. कोणत्याही आरोपीने आत्महत्या करू नये म्हणून हे विशेष पोलीस पहारा देत असतात. यासाठी डेथ सेलमधील कैद्यांना कोणत्याही गोष्टी जवळ बाळगण्यास परवानगी नसते. अगदी पायजमा किंवा शर्टही त्यांना घालायला दिला जात नाही. वाचा-हैदराबाद Encounter: खळबळजनक खुलासा, आरोपींनी आधी 9 महिलांना बलात्कार करून जाळलं दरम्यान फाशी देण्याची तारीख वेळ सगळं निश्चित झाल्यावर ब्लॅक वॉरंट निघतं. ते निघाल्यानंतर दिलेल्या वेळेत फाशी देणं जल्लादला बंधनकारक असतं. फाशीच्या फंद्यापर्यंत घेऊन जाण्याच्या मार्गावर पोलिसांची कडक सुरक्षा तैनात असते. यासोबतच आरोपीच्या डोक्यावर काळ्या रंगाचा कपडा टाकण्यात येतो. त्यानंतर जल्लाद त्याला शेवटची इच्छा विचारतो आणि फाशी देण्यात येते. दरम्यान निर्भाया सामूहिक बलात्कार प्रकरणी ब्लॅक वॉरंटबाबत 7 जानेवारीला सुनावणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आरोपींचा फाशीची तारीख नव्या वर्षात म्हणजेच 7 जानेवारीला निश्चित होणार असल्याची माहिती मिळत आहे. वाचा-निर्भयाच्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी वकिलाने दिला गांधी हत्येचा दाखला
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Nirbhaya, Nirbhaya gang rape case, Nirbhaya rape and murder case, Suprem court

    पुढील बातम्या