नायजेरियातील शाळेवर अज्ञात बंदुकधाऱ्यांनी केला हल्ला; 400 हून अधिक विद्यार्थी बेपत्ता

नायजेरियातील शाळेवर अज्ञात बंदुकधाऱ्यांनी केला हल्ला; 400 हून अधिक विद्यार्थी बेपत्ता

शुक्रवारी रात्री कंकरा येथील शासकीय विज्ञान माध्यमिक विद्यालयावर सशस्त्र हल्लेखोरांनी एके 47 रायफलने हल्ला केला.

  • Share this:

लागोस, 13 डिसेंबर : नायजेरियातील (Nigeria) उत्तर-पश्चिनी कटसीना राज्यातील एका माध्यमिक शाळेवर बंदूकधार्‍यांनी हल्ला (Gunmen Attack) केल्याचे वृत्त समोर आले आहे. यामध्ये शेकडो नायजेरियन विद्यार्थी बेपत्ता झाले आहेत. कॅटसीना राज्य पोलीसचे प्रवक्ते गॅम्बोआ इसाह म्हणाले की, 600 पेक्षा जास्त विद्यार्थी शाळेतून गायब झाले आहेत. शुक्रवारी रात्री कंकरा येथील शासकीय विज्ञान माध्यमिक विद्यालयावर सशस्त्र हल्लेखोरांनी एके 47 रायफलने हल्ला केला. इसाह यांनी सांगितले की पोलिसांनी हल्लेखोरांना चकमकीत अडकवून ठेवले, त्यामुळे अनेक शालेय विद्यार्थी शाळेच्या कुंपणावर उडी मारुन सुरक्षित पळून गेले. 600 विद्यार्थ्यांपैकी 200 जणांची सूचना मिळाली असून 400 विद्यार्थ्यांचा ((Four Hundred Student Missing)) शोध सुरू आहे.

विद्यार्थ्यांचा शोध सुरू

पोलिस प्रवक्ते गॅम्बोआ इसाह म्हणाले की, बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस, नायजेरियन आर्मी आणि नायजेरियन एअर फोर्स शालेय अधिकाऱ्यांसोबत काम करत आहेत. बेपत्ता विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी किंवा त्यांची सुटका करण्यासाठी तपास पथके कार्यरत आहेत. या भागातील स्थानिक रहिवासी मन्सूर बेलो यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की हल्लेखोर या हल्ल्यात काही विद्यार्थ्यांना आपल्यासोबत घेऊन गेले आहेत.

नायजेरियात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. शाळेवरील हल्ल्याची सर्वात गंभीर घटना आणि विद्यार्थ्यांचे अपहरण एप्रिल 204 मध्ये घडले होते. या घटनेत, बोको हराम या जिहादी गटाच्या सदस्यांनी ईशान्य बोर्नो राज्यातील चिबोक येथील शाळा वसतिगृहातून 276 मुलींचे अपहरण केले होते. या घटनेत अपहरण झालेल्या 276 मुलींपैकी 100 मुली अद्याप बेपत्ता आहेत. त्यांच्याशी संबंधित कोणतीही बातमी समोर आलेली नाही.

Published by: Meenal Gangurde
First published: December 13, 2020, 9:15 PM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या