Home /News /crime /

NIAकडून दाऊदच्या कृत्यांचा पंचनामा, सलीम फ्रूटच्या घरात कोट्यवधींची कागदपत्रे, अफाट इलेक्ट्रॉनिक डेटा

NIAकडून दाऊदच्या कृत्यांचा पंचनामा, सलीम फ्रूटच्या घरात कोट्यवधींची कागदपत्रे, अफाट इलेक्ट्रॉनिक डेटा

सलीम फ्रूटला एनआयएने काल बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्याला आज एनआयए कोर्टात दाखल केलं. एनआयएने यावेळी कोर्टात खूप महत्त्वाची माहिती सांगितली.

    मुंबई, 5 जुलै : भारत 1992 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटला कधीच विसरु शकत नाही. त्या हल्ल्याची झळ मुंबई आजही सोसत आहे. या हल्ल्यात शेकडो निरापराध लोकांचा बळी गेला होता. अनेकांचा जीव गेला होता, अनेकजण अपंग झाली होती. या हल्ल्याचा मास्टरमाईंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम देशाबाहेर पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. त्या घटनेला आता 30 वर्ष झाल्यानंतरही दाऊदचे कूकृत्य थांबलेले नाहीत. तो वारंवार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून भारताला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय. यासाठी तो त्याच्या हस्तकांच्या माध्यमातून देशात घातपात घडवण्याचा डाव साधतोय. दहशतवादी कारवायांसाठी पैसा गोळा व्हावा यासाठी मुंबईतील बड्या बांधकाम व्यावसायिकांना धमकी देत खंडणी गोळा करतोय. त्याच्या या कृत्यांचा सुगावा राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएला (NIA) लागलाय. याच प्रकरणाची चौकशी करत एनआयएच्या जाळ्यात मोठा मासा अडकला आहे. हा मासा म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक छोटा शकीलचा मेव्हणा सलीम कुरैशी उर्फ सलीम फ्रूट. या सलीम फ्रूटला एनआयएने काल बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्याला आज एनआयए कोर्टात दाखल केलं. एनआयएने यावेळी कोर्टात खूप महत्त्वाची माहिती सांगितली. अखेर एनआयएला या प्रकरणी खोलवर तपास करता यावा यासाठी कोर्टाने सलीम फ्रूटला 17 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. छोटा शकीलचा मेव्हणा सलीम कुरैशी उर्फ सलीम फ्रूटला एनआयए कोर्टाने 17 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. एनआयएने डी कंपनीच्या काळ्या कारभाराविरोधात 3 फेब्रुवारी 2022 रोजी गुन्हा दाखल केला होता. गुन्हेगारी कृत्य, टेरर फंडींग प्रकरणी संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला होता. एनआयएने सलीम फ्रूटच्या घरी 9 मे रोजी छापा टाकला होता. त्यावेळी एनआयएच्या हाती काही महत्त्वाचे कागदपत्रे लागली होती. यामध्ये अनेक बांधकाम व्यवसायिकांचे (बिल्डरांचे) प्रोजेक्ट, करार आणि इतर महत्त्वाचे कागदपत्रे मिळाली होती. एनआयएला सलीमच्या घरात अनेकांच्या संपत्तीचे कागदपत्रे आढळली होती. विशेष म्हणजे सलीमच्या घरात विदेशी smuggled सिगरेट आढळली होती. (नामांकित बिल्डरला धमकी, मुंबईत पुन्हा डी गँग कार्यरत? छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रूटला बेड्या) एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, सलीमच्या घरात तब्बल 1 हजार पानांचे कागदपत्रे आणि टेराबाईट्समध्ये मेमरी कार्डचा डेटा सापडला आहे. सलीम हा चौकशीदरम्यान एनआयएला चुकीची माहिती देत होता. तो अधिकाऱ्यांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्याकडे मिळालेले कागपत्रे आणि इतर डेटाचा तपास आणि शहानिशा व्हायला हवी. त्याच्या घरी मिळालेले कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक डेटा आणि प्रोजेक्ट अॅग्रीमेंट्स फॉरेन्सिक ऑडिट करणं जरुरीचं आहे, असं एनआयएचं म्हणणं आहे. सलीम फ्रूट हा मोठमोठ्या बिल्डरांना धमकावून खंडणी वसूल करायचा आणि तो पैसा अंडरवर्ल्ड आणि डी कंपनीला पाठवायचा, असा एनआयएला संशय आहे. विशेष म्हणजे डी कंपनीला वेगवेगळ्या पद्धतीने देशाबाहेर पैसे पाठवले जातात. त्या पैशांना ट्रेस केलं जात नाही. त्यामुळे त्यासंबंधित व्यवहारांची आणि ट्रान्झेक्शनची माहिती बाहेर काढायची आहे. याशिवाय त्याचे डी कंपनीतील आणखी कोणाकोणासोबत लागेबंध आहेत त्याची देखील माहिती गोळा करायची आहे, असं एनआयएने कोर्टात सांगितलं. विशेष म्हणजे पाच बड्या बिल्डरांनी सलीमच्या विरोधात एनआयएला जबाब दिल्याची माहिती एनआयएने कोर्टात दिली. तसेच 17 ऑगस्टपर्यंत त्याची कोठडी मागितली. एनआयची बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने सलीमची कोठडी मान्य केली. सलीम बिल्डरांना द्यायचा धमकी, उकळायचा पैसे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटा शकीलचा मेव्हणा सलीम कुरैशीने मुंबईतील एका नामांकित बिल्डरला धमकी दिली होती. सलीम दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीसच्या नावाने धमकी दिली होती. तसेच त्याने बिल्डरकडे त्याच्या सुरु असलेल्या एका प्रोजेक्टमधील दोन फ्लॅटची डिमांड केलेली होती. संबंधित नामांकित बिल्डरने घाबरुन सलीमची ती मागणी पूर्ण केली होती. बिल्डरने आपल्या सुरु असलेल्या प्रोजेक्टमधून दोन फ्लॅट सलीमला दिले होते. पण त्यानंतर सलीमची आणखी हिंमत वाढली. त्याने पुन्हा बिल्डरला धमकी देण्यास सुरुवात केली. तो बिल्डरकडे संबंधित प्रोजेक्टमध्ये आर्धी पार्टनर्शीप मागू लागला. तो बिल्डरला यासाठी प्रचंड त्रास देत होता. अखेर एनआयएला याबाबतची माहिती मिळाली. विशेष म्हणजे एनआयएने त्याआधीच सलीम कुरैशी याच्याविरोधात डी कंपनीशी संबंधित आणि त्याच्या काळ्या कूकृत्यांप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, संबंधित प्रकरणाच्या तपासानंतर एनआयएने सलीमला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. त्यानंतर त्याला अटक केली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या