मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

दोन लाखांचं बक्षीस असलेल्या आरोपीला बेड्या, अमरावतीच्या हत्या प्रकरणात NIA ला मोठं यश

दोन लाखांचं बक्षीस असलेल्या आरोपीला बेड्या, अमरावतीच्या हत्या प्रकरणात NIA ला मोठं यश

अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA ) मोठं यश आलं आहे.

अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA ) मोठं यश आलं आहे.

अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA ) मोठं यश आलं आहे.

  • Published by:  Rahul Punde
मुंबई, 21 सप्टेंबर : अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA ) मोठं यश आलं आहे. एनआयएने या प्रकरणातील फरार अकराव्या आरोपीला मुंबईतून अटक केली. एजन्सीने त्याच्या अटकेसाठी कोणत्याही माहितीसाठी 2 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते 21 जून रोजी अमरावती येथील औषध विक्रेता उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ फेसबुकवर पोस्ट लिहिल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. शैम अहमद असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याअगोदर दहावा आरोपी शेख शकील 13 ऑगस्टला अटक करण्यात आली. शैम अहमद हत्येच्या कटात सामील होता, असे एनआयएने म्हटले आहे. यापूर्वी 13 ऑगस्ट, 23 जून, 24 जून, 25 जून, 2 जुलै आणि 2 ऑगस्ट रोजी या प्रकरणात 10 आरोपींना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी 22 जून रोजी गुन्हा दाखल केला होता. एनआयएने 2 जुलै रोजी पुन्हा गुन्हा नोंदवला. एनआयए एफआयआरमध्ये म्हटले आहे की कोल्हे यांची हत्या धर्माच्या आधारावर लोकांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याच्या आणि दहशत निर्माण करण्याच्या कटाचा भाग म्हणून करण्यात आली होती. याचा पुढील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सुरू असून लवकरच अन्य गोष्टी देखील बाहेर येतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. वाचा - LPU विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणाला नवा ट्वीस्ट, सुसाईड नोटमध्ये प्राध्यापकाचं नाव मेडिकल स्टोअरमधून परतत असताना घडली घटना ही घटना 21 जून रोजी रात्री 10 ते 10.30 च्या दरम्यान उमेश दुकान बंद करून दुचाकीवर घरी परतत असताना घडली. यादरम्यान उमेश यांचा मुलगा संकेत आणि पत्नी वैष्णवी हे त्यांच्यासोबत दुसऱ्या दुचाकीवरून चालले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश महिला महाविद्यालयाच्या गेटजवळ येताच मागून दोन दुचाकीस्वार आले आणि त्यांनी उमेशचा रस्ता अडवला. दुचाकीवरून उतरलेल्या तरुणाने उमेश यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून घटनास्थळावरून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात उमेश रस्त्यावर पडले. यानंतर संकेतने त्यांना रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला होता.
First published:

Tags: Crime

पुढील बातम्या