मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पतीला सोडून चुलत भावासोबत पळाली; लग्नाच्या 5 व्या दिवशीच नवरीचा प्रताप

पतीला सोडून चुलत भावासोबत पळाली; लग्नाच्या 5 व्या दिवशीच नवरीचा प्रताप

लग्नानंतरचे 4 दिवस तरुणी सासरी आनंदात राहिली होती.

लग्नानंतरचे 4 दिवस तरुणी सासरी आनंदात राहिली होती.

लग्नानंतरचे 4 दिवस तरुणी सासरी आनंदात राहिली होती.

पाटना, 11 फेब्रुवारी : बिहारमधील (Bihar News) शेखपुरामध्ये एक नवविवाहिता आपल्या प्रियकरासोबत (Newlyweds girl ran away with cousins ) फरार झाली. धक्कादायक बाब म्हणजे 5 दिवसांपूर्वीच तिचं लग्न झालं होतं. तेदेखील कुणा बाहेरच्या व्यक्तीसोबत नव्हे तर आपल्यात चुलत भावासोबत फरार झाली. मुलीच्या वडिलांनी या प्रकरणात अपहरणाची तक्रार दाखल केली. यानंतर हा खुलासा झाला. मुलीच्या वडिलांकडून तिला आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

ही घटना सामस गावातील आहे. 5 फेब्रुवारी रोजी पाटनाच्या रामकृष्ण नगर येथे राहणाऱ्या मुलीचं लग्न शेखपूरातील बरबीधा येथील मुलासोबत ठरलं होतं. लग्नानंतर मुलगी सासरी आली. 4 दिवसांपर्यंत ती सासरी चांगली राहिलीही. ती आपल्या प्रियकरासोबत मिळून काय करणार होती, हे कोणालाही माहिती नव्हतं.

हे ही वाचा-मुंबईला जाताना ट्रेनमध्ये तरुणाची तब्येत बिघडली;पुढील स्टेशन येईपर्यंत सोडला जीव

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 फेब्रुवारी गुरुवारी ती सासऱ्याहून गायब झाली. पती आणि सासरच्या मंडळींनी तपास केला तर खोलीत सोन्या-चांदीचे दागिने नव्हते. यानंतर त्यांनी मुलीच्या वडिलांना फोन करून सांगितलं की, त्यांची मुलगी घरातून दागिने-पैसे घेऊन पळून गेली. यानंतर तातडीने सासरच्या मंडळींना तिचा तपास सुरू केला. यानंतर कळालं की, ती आपल्या चुलत भावासोबत पळून गेली आहे. या प्रकरणात मुलीचा आणि तिच्या प्रियकराचा शोध सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Bihar, Crime, Marriage