मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

लव्ह मॅरेजचा भयंकर शेवट; मे महिन्यात लग्न, 3 दिवसांपूर्वीच तरुणीने दिले संकेत, शेवटी...

लव्ह मॅरेजचा भयंकर शेवट; मे महिन्यात लग्न, 3 दिवसांपूर्वीच तरुणीने दिले संकेत, शेवटी...

3 दिवसांपूर्वी दीपशिखाने संकेत दिले होते. मात्र कोणाच्या काही लक्षात येण्यापूर्वी भयंकर प्रकार घडला.

3 दिवसांपूर्वी दीपशिखाने संकेत दिले होते. मात्र कोणाच्या काही लक्षात येण्यापूर्वी भयंकर प्रकार घडला.

3 दिवसांपूर्वी दीपशिखाने संकेत दिले होते. मात्र कोणाच्या काही लक्षात येण्यापूर्वी भयंकर प्रकार घडला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

इंदूर, 27 ऑगस्ट : मध्य प्रदेशातून प्रेम विवाहाचा दुखद शेवट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंदूरमध्ये प्रेम विवाहाच्या 4 महिन्यानंतर नवविवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नवविवाहिता गेल्या तीन दिवसांपासून सोशल मीडियावर दुखद स्टेटस ठेवत होती. यावरुन ती नैराश्यात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीचं हुंड्यासाठी शोषण केल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. अद्याप नवविवाहितेच्या आत्महत्येचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. पोलिसांनी दीपशिखा आणि तिच्या पतीचा मोबाइल जप्त केला आहे.  पोलिसांनी FIR दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

इंदूरच्या खजराना भागातील आशा नगरमध्ये राहणारी दीपशिखा शर्मा हिने चार महिन्यांपूर्वी कॅफेचं मॅनेजमेंट पाहणाऱ्या तरुणासोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर दाम्पत्य कुटुंबीयांपासून वेगळं राहत होते. दीपशिखा शर्माने गुरुवारी रात्री गळफास घेत आत्महत्या केली. शुभमने सर्वात आधी दीपशिखाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. सूचना मिळताच तरुणीचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले. घटनास्थळाहून कोणाताही पुरावा वा सुसाइड नोट सापडलेली नाही.

आई वडिलांना म्हणाला बाय...अनं विद्यार्थ्याची टेरेसवरून मारली उडी; मृत्यू

मेंहदी आर्टिस्ट होती तरुणी..

दीपशिखा मेहंदी आर्टिस्ट होती. काम करीत असताना तिची ओळख सराफामध्ये कॅफे सांभाळणाऱ्या शुभम शर्माशी झाली होती. यादरम्यान दोघेही प्रेमात पडले. यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. शुभम मूळत: ग्वाल्हेरच्या मुरार भागातील राहणारा आहे. तो गेल्या काही वर्षांपासून इंदूरमध्ये राहत होता. 4 महिन्यांपूर्वीच दीपशिखासोबत त्याचं लग्न झालं होतं.  दीपशिखाचा मोठा भाऊ पीयूषनेही कर्जामुळे काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती.

First published:

Tags: Crime news, Madhya pradesh, Wife